कोल्हापूर - जिल्ह्यात शाळांचे 'तुर्तास' कंपनीकरण टळले 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

कोल्हापूर : शिक्षण बचाओ कृती समिती व शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची आज कोल्हापूर येथील शासकीय विश्राम गृह येथे बैठक झाली. जिल्ह्यातील 13 शाळा ज्या कमी पटसंख्येमुळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या बाबत विशेष समिती नेमून त्या शाळांच्या मुख्य परिस्तिथीचा आढावा घेऊन मगच निर्णय घेतला जाणार आहे. ज्या गावातल्या शाळांची पटसंख्या कमी आहे तेथील पटसंख्या वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असल्याचे देखील सांगितले या साठी कोल्हापूर पॅटर्न तयार केलं असून तो राज्यात इतरत्र देखील राबवला जाईल असे देखील सांगितले.  

शाळांचे खासगीकरण होणार नसून   ना नफा ना तोटा या धर्तीवर ते राबवण्यात येणार आहे. या मुळे शाळा बंद नाही पडणार. जिल्हापरिषद शाळा असणाऱ्या ठिकाणी हा प्रयोग होणार नाही आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आल्याचे बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.    

शाळांच्या गुणवत्ता वाढवण्यासाठी कंपनी शाळांचा प्रस्ताव आहे. मात्र अशा शाळांमुळे जिल्हा परिषद शाळा बंद पडतील, अशी स्वाभाविक भिती व्यक्‍त होत आहे. मात्र जिथे जिल्हा परिषद शाळा आहेत, तिथे या ठिकाणी कंपनी शाळेला परवानगी तूर्त दिली जाणार नाही.

जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता वाढवण्याचे धोरण ठरवण्यात आले आहे. ते राज्यभर आहे. इथे विशेष कोल्हापूर पॅटर्न करणार आहोत, याचाही विचार केला जाईल. मात्र जिल्ह्यात होत असलेला विरोध पाहता हा सीएसआर निधी नाही. ना नफा ना तोटा या तत्वावर कंपन्यांकडून या शाळा चालवल्या जाणार आहेत. 

Web Title: privatization of school are still on hold in kolhapur