नवउद्योजकांसाठी सक्‍सेस मंत्रा..!

नवउद्योजकांसाठी सक्‍सेस मंत्रा..!

कोल्हापूर - व्यवसाय सुरू करताय? मात्र, त्यातील यशाबद्दल शाश्‍वती नसेल तर आता ‘टेन्शन’ घेण्याचे कारण नाही.  विवेकानंद महाविद्यालयातील प्रियांका मदनलाल पुरोहित (बी.कॉम, भाग-३) हिने ‘बिझनेस मॉडेल’ तयार केले आहे. त्याद्वारे नवउद्योजकांना व्यवसायात यशाची खात्री दिली.

विशेष म्हणजे मारवाडी व अन्य समाजातील उद्योजक यांच्यातील उद्योगांचा तुलनात्मक अभ्यास करून तिने 
मारवाडी समाज उद्योगात यशस्वी का आहे, याची मांडणीही केली आहे. यासाठी तिने १६३ उद्योजकांचा सर्वे केला असून, ७१ मारवाडी, तर अन्य समाजातील ९२ उद्योजकांचा त्यात समावेश आहे.

व्यवसाय कौशल्ये (टक्‍क्‍यांत)
    मारवाडी    अन्य समाज

  • नावीन्यपूर्ण कल्पना     ७६.०६     ६३.०४
  • निर्णय क्षमता     ९०.१४      ४४.५७
  • पैशांची अचूक गुंतवणूक      १००     ५२.१७
  • धोका पत्करण्याची क्षमता    ७०.४२    ३३.७०
  • नियोजनपूर्वक कामाची क्षमता    ८५.९२     ४७.८३
  • अन्य उद्योगांचे मैत्रीपूर्ण संबंध    १००    ११.९६
  • क्षमता व त्रुटी यांची जाणीव    ९९.१४     ६९.५७
  • ग्राहक सेवा     ९७.१८     ५५.४३
  • दुकानाच्या दर्शनी भागाची आकर्षक मांडणी    १००     ६३.०४
     

प्रियांकाने जिल्हास्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेत सलग तीन वेळा प्रथम, राज्यस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला आहे. सर्वेक्षणातील उद्योजकांत मारवाडी समाज अन्य समाजातील उद्योजकांपेक्षा अग्रेसर का, याचा शोध प्रकल्पाद्वारे घेतला आहे. मारवाडी उद्योजकांत कोणीही अशिक्षित नाही. मात्र, अन्य समाजातील उद्योजकांत १४ उद्योजक अशिक्षित आहेत.

मारवाडी समाजातील १९ उद्योजक पदवीधर असून, अन्य समाजातील हेच प्रमाण ३१ इतके आहे. मारवाडी उद्योजक एकाच व्यवसायात गुंतवणूक न करता विविध व्यवसायांतही गुंतवणूक करतात. अन्य समाजातील उद्योजक मात्र एकाच व्यवसायात धन्यता मानतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मारवाडी उद्योजक विविध सवलत योजना जाहीर करतात. अन्य उद्योजक तसे करताना दिसत नाहीत. असे महत्त्वपूर्ण निष्कर्ष प्रकल्पात तिने मांडले आहेत. 

कृषी उत्पादनातील दरांचे चढ-उतार या विषयावर तिने यापूर्वी प्रकल्प सादर केला होता. ती म्हणते, ‘‘मारवाडी समाज उद्योगात पुढे का, याची उत्सुकता होती. या प्रकल्पाद्वारे त्यांच्या यशाची सूत्रे उलगडत गेली. यापुढे वैविध्यपूर्ण प्रकल्प सादर करून मला पेटंट मिळवायचे आहे. त्यासाठी माझे काम सुरू आहे. ’’

                 नफ्याचा वापर (संख्या)
* मारवाडी                    * अन्य उद्योजक
* बचत * ०                   * ४५
* पुनर्गुंतवणूक * २६      * ३५
* अन्य व्यवसायांत गुंतवणूक * ३६ *१२
* व्यवसायासाठी समाजघटकांना पैसा देणारे
* ९ *०

                        शिक्षण (संख्या)
* मारवाडी                      * अन्य उद्योजक
* अशिक्षित * ०               * १४
* प्राथमिक * ३४             * २२
* माध्यमिक, उच्च माध्यमिक* १८ * २५
* पदवीधर * १९                  * ३१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com