मूल दत्तक घ्यायचे आहे, तर मग अशी आहे प्रक्रिया 

अशोक मुरूमकर 
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

अनाथ, निर्धार मुलांसह कोणीही मूल दत्तक देऊ शकतो व घेऊ शकतो, यासाठी www.cara.nic.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्‍यक आहे. या संकेतस्थळावर संपूर्ण माहिती दिली आहे. जगभरातून कोठूनही पालक मुलांसाठी नोंदणी करू शकतात. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयात अधिक माहिती उपलब्ध आहे.

सोलापूर : मुलं होत नाही म्हणून अनेकजण निराश असतात. मुलासाठी काहीजणांची भावनेच्या आहारी जाऊन फसवणूक होते. ग्रामीण भागात तर काहीजण अंधश्रद्धेच्या नावाखाली चोरीचोरी उपचार पद्धती राबवतात. काही ठिकाणी तर विवाहितेला छळालाही सामोरे जावे लागते. मात्र, मुलं होत नसेल तर तुम्ही दत्तकही घेऊ शकतात. पण ते कसे घ्यायचे याची अनेकांना माहितीच नसते. या पद्धतीबाबतीत थोडक्‍यात... 

Image may contain: 2 people, people smiling, text

हेही वाचा : विद्यार्थ्यांच्या खिचडीत आढळला मेलेला उंदीर... 
मागणीच्या प्रमाणात मुले नाहीत.... 

मुलं दत्तक घेण्यासाठी सध्या प्रचंड मागणी आहे. मात्र त्या प्रमाणात मुले उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे मुलं देता का मुलं, असं म्हणण्याची वेळ इच्छुक पालकांवर आली आहे. सरकारच्या "कारा' या संकेतस्थळावर मुलं दत्तक घेण्यासाठी अर्ज केले जात आहेत. त्यात राज्याबाहेरचे पालकही अर्ज करत आहेत. मुलांना योग्य पालक मिळावेत म्हणून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाते. त्यानंतरच संबंधित मूल दत्तक दिले जाते. "पालकांना मुलं उपलब्ध करून देणे, हा उद्देश नसून मुलांना योग्य पालक देणे' हा "कारा'चा उद्देश असल्याचे महिला व बाल विकास विभागाकडून सांगण्यात येत आहे. 

Image may contain: 6 people, people smiling, text

हेही वाचा : पती म्हणतो, तुला तिसरं मूल झालंच कसं? 
देशातील मुले दिसतात 

मुलांना चांगले पालक मिळावेत व इच्छुकांना मुलं दत्तक घेता यावे, यासाठी महिला व बाल विकास विभागांतर्गत केंद्रीय दत्तक प्राधिकरणाच्या "कारा' या संकेतस्थळावर आवश्‍यक त्या मुलाची नोंदणी केली जाते. त्यानुसार पालक मुलांच्या मागणीसाठी अर्ज करतात. नियमानुसार पालकांनी मुलासाठी नावनोंदणी करणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर या संकेतस्थळावर मुलांचीही नोंदणी केली जात आहे. दत्तक मुलांमध्ये अनाथ, निर्धार व इतर प्रकारची मुले असल्याचे सांगितले जात आहे. मुलासाठी नोंदणी केल्यानंतर संबंधित पालकांना संपूर्ण देशातील मुलांमधून आवश्‍यक त्या मुलांची निवड करावी लागते. 

हेही वाचा : जाणून घ्या, सोलापुरात का येतोय सर्वाधिक कांदा 
तीन राज्याचा पर्याय 

निवड केल्यानंतर संबंधित पालकाची कायदेशीर चौकशी केली जाते. त्यांना तीन राज्यांचा पर्यायही दिला जातो. योग्य त्या राज्याची निवड केल्यानंतर, कायदेशीर प्रक्रिया केल्यानंतर मूल दत्तक दिले जाते. सिंगल पालकांना (पुरुषांना) मूल दत्तक दिले जात नाही. मुलं देताना ज्या-त्या जिल्ह्यात नेमणूक केलेल्या संस्थांकडून संबंधित पालकांची चौकशी केली जाते. चौकशी अहवालानंतरच मूल दत्तक दिले जाते, असे सोलापुरातील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विभागातील नितीन थोरात यांनी सांगितले. 

 

Image may contain: 3 people, people smiling

हेही वाचा : पोथरेतील शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग (व्हिडिओ) 
दत्तक मुलांसाठी असे असते वय... 
मुलाचे वय      पालकांचे वय         दोघांचे वय 
0-4                90                        45+45 
4-8               100                       50+50 
8-18             110                        55+55 

अशी आहे प्रक्रिया... 

  • मूल दत्तक देण्यासाठी पालकांनी "कारा'च्या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्‍यक 
  • मुलाची संपूर्ण माहिती ऑनलाइन अपलोड करणे आवश्‍यक
  • संबंधिताची चौकशी केली जाते 
  • गृहविभागाकडून चौकशी केल्यानंतर त्याचा अहवाल अपलोड केला जातो 
  • तीन राज्ये निवडली जातात (उदा. महाराष्ट्र, कनार्टक, गोवा) 

बापरे! पेट्रोल, डिझेलपेक्षा खायचे तेल महाग 
अधिक माहितीसाठी... 

अनाथ, निर्धार मुलांसह कोणीही मूल दत्तक देऊ शकतो व घेऊ शकतो, यासाठी www.cara.nic.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्‍यक आहे. या संकेतस्थळावर संपूर्ण माहिती दिली आहे. जगभरातून कोठूनही पालक मुलांसाठी नोंदणी करू शकतात. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयात अधिक माहिती उपलब्ध आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The process is for the child to be adopted