निवडणूक प्रक्रियेबाबत संशय निर्माण करणाऱ्यांविरोधात फौजदारी : खेबुडकर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

सांगली : महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेबाबत संशयाचे वातावरण तयार केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी सांगितले. दरम्यान, आज सकाळी दहा वाजता आयुक्तांनी प्रभाग क्रमांक 4 मध्ये मतांची आकडेवारी निकालापूर्वीच निश्चित करण्यात आल्याचा आरोपांबाबत विविध कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली.

कार्यकर्त्यांच्या शंकांचे निरसन केले. यावेळी निवडणूक अधिकारी स्मिता कुलकर्णी, उपायुक्त सुनील पवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. आज सुट्टी असूनही अधिकारी उपस्थित होते. चर्चेअंती अश्रफ वांकर यांनी निवडणूक कक्ष अधिकारी के. सी. हळिंगळे यांच्याकडे न्यायालयात जाण्यासाठी कागदपत्रांची मागणी केली.

अश्रफ वाकंर, तानाजी रुईकर यांच्या व्हॉट्सअॅपवर प्रभाग 4 मधील निकाल आकडेवारी पाठवली होती. कागदावर 18 जुलै तारीख असून, निवडणूक निर्णय अधिकाऱयांची सही आहे. महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल 3 आॅगस्ट रोजी जाहीर झाला. तत्पूर्वी ही आकडेवारी कशी लिहिली गेली, असा सवाल या कार्यकर्त्यांनी केला. त्यानंतर संशयाचे वातावरण तयार झाले. आज आयुक्तांनी बैठक घेऊन खुलासा केला.

ज्या कागदाचा हवाला दिला जात आहे. तो कागद नेटवर उपलब्ध आहे. त्यांच्या झेराॅक्स प्रती कार्यकर्त्यांच्या हाती देण्यात आल्या. प्रशासनावर असा गैरविश्वास दाखवणे लोकशाहीस मारक आहे. शंका जरूर घ्या. मात्र अविश्वास तयार करू नका. हा प्रकार गंभीर असून त्याबाबत पालिकेकडून फौजदारी दाखल केली जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

Web Title: In process of election those who creates suspicions will registered criminal offences says Khebudkar