पॅनकार्ड काढायचे आहे, तर कशी आहे प्रक्रिया वाचा 

अशोक मुरुमकर 
बुधवार, 4 डिसेंबर 2019

फिजिकल पॅनकार्ड हे डॉक्‍युमेंटद्वारे मिळते. तर ई पॅन हे आपण अर्ज भरताना दिलेल्या ईमेलवर मिळते. या दोन्ही पॅनचा उपयोग समान कामासाठी करता येतो. संकेतस्थळावर त्याची पूर्ण माहिती दिलेली आहे. 
- लहू काळे, चार्टर्ड अकाउंटंट

सोलापूर : पॅनकार्ड हे एक महत्त्वाचे डॉक्‍युमेंट आहे. कोणत्याही शासकीय कामात तुम्हाला ते विचारले जाते. अनेकांकडे हे पॅनकार्ड असते तर काहींकडे ते नसते. एखाद्या कामावेळी तुम्हाला पॅनकार्ड आहे का? असे विचारले जाते. मात्र, लगेच पोटात गोळा येतो. आता कधी मिळणार पॅनकार्ड, कुठे मिळणार असे एक ना अनेक प्रश्‍न निर्माण होतात. मात्र, हे पॅनकार्ड काढणं खूप सोप आहे. मात्र, ते कसे काढायचे याची माहितीच नसते.

No photo description available.

काहीजण तर त्यासाठी अनेकदा हेलपाटे मारतात. काहीजण त्यासाठी जादा पैसेही मोजतात. पण सध्या ही प्रक्रिया सरकारच्या आयकर विभागाकडून ऑनलाइन असल्यामुळे अतिशय सुलभ झाली आहे. किचकट वाटणारी ही प्रक्रिया तुम्ही घरी बसल्या सहजपणे करून पॅनकार्ड काढू शकतात. या प्रक्रियेबाबत... 

हेही वाचा : सिंचन प्रकल्पाचे "ग्रहण' अजित पवारांच्या नाही तर, फडणवीसांच्या मागे 
हे आहे संकेत स्थळ... 

पॅनकार्ड काढण्यासाठी
https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html 
या संकेतस्थळावर जावा. तिथे ऍप्लाय ऑनलाइन हे ऑप्शन निवडा. त्यातील नेव पॅन हा ऑप्शन निवडा. त्यानंतर कॅटॅगरीमध्ये इनड्युझिअल निवडा. त्यानंतर विचारलेली ऑनलाइन माहिती संकेतस्थळावर भरा. ही माहिती भरत असताना ज्या ठिकाणी लाल रंगाचे स्टार आहे ती माहिती भरणे आवश्‍यक आहे. त्यात आधार कार्ड नंबर लिंक असलेला मोबाईल नंबर टाका. त्यानंतर तुम्हाला कॅप्चा विचारला जाईल तो टाका. 

No photo description available.

हेही वाचा : संभाजी भिडेंना सहानुभूतीचा प्रश्‍नच नाही ः जयंत पाटील यांचे स्पष्टीकरण 
टोकन क्रमांक 

पॅनकार्डसाठी संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर शेवटी कॅप्चा व त्यानंतर सर्व माहिती सबमिट केल्यानंतर नवीन विंडो ओपन होईल. त्यात टोकन क्रमांक मिळेल. त्यावर कंटिनीव्ह विथ मॅन ऍप्लिकेशन फॉर्म यावर क्‍लिक करा. त्यानंतर दुसरी विंडो ओपन होईल. त्यात पाच टप्प्यात आपली माहिती विचारली जाईल, ती माहिती भरणे आवश्‍यक आहे. सुरवातीला माहिती भरताना सबमिट डिजिटली स्ट्रॉंग ई-केवायसी अँड ई साईन (पेपरलेस) याला क्‍लिक करावे. पॅनकार्डचा प्रकार व त्यानुसार किती शुल्क याचीही यावर माहिती दिली आहे. साधारण 107 रुपयांत नागरिकाचे पॅनकार्डचे शुल्क आहे. तेही तुम्ही ऑनलाइन भरून अवघ्या काही वेळांत हे पॅनकार्ड मिळू शकते. 

No photo description available.

हेही वाचा : मूल दत्तक घ्यायचे आहे, तर मग अशी आहे प्रक्रिया 
माहितीसाठी अनेक व्हिडिओ 

ऑनलाइन पॅनकार्ड काढण्यासाठी सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आहेत. संकेतस्थळावर देखील याची माहिती देण्यात आली आहे. पॅनकार्डसाठी लागणारा वेळ आणि खर्च होणे यामुळे टळू शकते आणि विशेष म्हणजे पॅनकार्ड काढण्यासाठी जी मनात भीती असते ती यामुळे कमी होऊ शकते. 

हेही वाचा : जात पडताळणी कार्यालयाचे मेसेज बंद 
 

No photo description available.

यासाठी होतो पॅनकार्डचा वापर (थोडक्‍यात) 

  • बॅंकिंगच्या कोणत्याही कामासाठी 
  • जमीन व गाडी खरेदी विक्रीसाठी 
  • नोकरी करत असताना 
  • बॅंकेत एफडी करताना 
  • ओळखपत्र म्हणून वापर
  • कर्ज घेण्यासाठी आवश्‍यक 
  • व्यवसाय करण्यासाठी
  • जीएसटी करण्यासाठी 
  • कंपनीला टेंडर भरण्यासाठी 

Image may contain: Lahu Kale, selfie and close-up

ई पॅनकार्ड 
ई पॅनकार्डवर तुम्ही कामकाज करू शकता. फिजिकल पॅनकार्डसाठी 10 ते 30 दिवसांचा कालावधी लागतो. मात्र, ई पॅन कार्ड 0 ते सात दिवसांत मिळते. त्यामुळे पॅनकार्डसाठी लागणारा वेळ वाचतो. ई केवायसी/ डिजिटल सिग्नेचरच्या (डीएससी) माध्यमातून हे पॅनकार्ड मिळते. फिजिकल पॅनकार्ड हे डॉक्‍युमेंटद्वारे मिळते. तर ई पॅन हे आपण अर्ज भरताना दिलेल्या ईमेलवर मिळते. या दोन्ही पॅनचा उपयोग समान कामासाठी करता येतो. संकेतस्थळावर त्याची पूर्ण माहिती दिलेली आहे. 
- लहू काळे, चार्टर्ड अकाउंटंट 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The process of new PAN card