शेतकरी पेन्शनसाठी लढा उभारणार - प्रा. शरद पाटील  

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

सांगली - शेतकऱ्यांना दरमहा दोन हजार रुपये पेन्शनसाठी जनता दलातर्फे तीव्र लढा उभारण्यात येईल, असा इशारा अध्यक्ष माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी दिला.

ते म्हणाले, ‘‘पेन्शनसाठी जनता दल २०१२ पासून पाठपुरावा करत आहे. केरळमध्ये ही योजना लागू आहे. त्या धर्तीवर महाराष्ट्रातही शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी पेन्शन सुरू करण्याची मागणी आहे. आयुष्यभर शेतात राबून देशाला अन्न पुरवणाऱ्या शेतकऱ्याला म्हातारपणी औषधासाठीही पैसे मिळू नयेत यासारखे दुर्दैव नाही.

मध्य प्रदेश सरकारने सत्तेवर येताच हजार रुपयांची पेन्शन जाहीर केली. दिल्लीत ६० वर्षांवरील शेतकऱ्यांना दोन हजार रुपये, तर हरियाणा सरकारने दरमहा १ हजार ८०० रुपये पेन्शन सुरू केली आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यानेही पावले उचलायला हवीत. यासाठी फेब्रुवारीत विधानसभेवर अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी राज्यभरातील शेतकरी धडक देणार आहेत.
- प्रा. शरद पाटील

Web Title: Prof Sharad Patil comment