शिक्षक महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी प्राध्यापक हरीदास गवळी 

चंद्रकांत देवकते
गुरुवार, 19 जुलै 2018

मोहोळ : सोलापूर जिल्हा कनिष्ठ शिक्षक महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी मोहोळ येथील देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालयातील प्राध्यापक हरीदास गवळी यांची एकमताने निवड करण्यात आली. सोलापूर येथील एच.डी. ज्युनिअर महाविद्यालयात घेण्यात आलेल्या जिल्हा कार्यकारीणीच्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष टी.टी. कुंभार होते. प्रा गवळी हे मोहोळ येथील  कै.संभाजीराव गरड कनिष्ठ महाविद्यालयात राज्यशास्त्राचे शिक्षक म्हणुन 25 वर्षापासुन कार्यरत आहेत. शैक्षणिक कार्याबरोबरच सांस्कृतिक, सामाजिक व संघटनात्मक कार्यातही त्यांचा सहभाग उल्लेखनिय आहे. या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीस प्रामुख्याने शिक्षक संघटनेचे पुणे विभागीय सचिव प्रा. विलास मोरे, प्रा. आर. एल. कांबळे, शिक्षक महासंघाचे सोलापूरचे शहराध्यक्ष प्रा. एस. बी. मुडगी, आर. एच. क्षिरसागर, एल. एम. अभंग, एस. एच. गायकवाड (बार्शी), डी.सी. क्षिरसागर, एल. टी. राख आदीसह कार्यकारीणीचे बहुसंख्य सभासद उपस्थीत होते.                       

Web Title: Professor Haridas Gawali as District President of Teachers Federation