प्रायोगिक शेतीमधून प्रगतीकडे वाटचाल; ऊस, आले, हळद पिकांची लागवड

Progress from experimental farming; Cultivation of sugarcane, ginger, turmeric crops
Progress from experimental farming; Cultivation of sugarcane, ginger, turmeric crops

कडेगाव (जि. सांगली) : तालुक्‍यात पारंपरिक शेतीला बगल देऊन शेतकरी नवनवीन पिकांचे प्रयोग करताना दिसत आहे. ऊस पिकासह आले व हळद पिकांच्या लागवडीत या वर्षी लक्षणीय वाढ झाली आहे. आधुनिक शेतीच्या माध्यमातून तालुक्‍यातील शेतकऱ्यांची प्रगतीकडे वाटचाल सुरू असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. 

कडेगाव तालुका दुष्काळी आणि डोंगराळ तालुका म्हणून ओळखला जात होता. परंतु सिंचन योजंनामुळे या तालुक्‍याचा कायापालट झाला आहे. तालुक्‍याचे एकूण अठ्ठावन हजार हेक्‍टर क्षेत्र आहे. ताकारी योजनेमुळे तालुक्‍यातील सोनहिरा खोऱ्यातील तेरा गावे सुजलाम्‌ सुफलाम्‌ झाली आहेत. उरलेल्या बहुतांश गावांना आता टेंभू योजनेचे पाणी मिळू लागले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाने आता पारंपरिक पिकांना फाटा दिला असून आधुनिक पद्धतीने शेती करताना दिसू लागली आहेत.

तालुक्‍यात पारंपरिक पिकाऐवजी ऊस शेती, भाजपला आणि फळबागांची शेती मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र दिसत आहेत. तालुक्‍यात सुमारे वीस हजार हेक्‍टर ऊस पिकाचे क्षेत्र आहे. तर भाजीपाला, फळबागांचे सुमारे एक हजार हेक्‍टर क्षेत्र आहे. दरम्यान, तालुक्‍यात चालूवर्षी आले पिकाच्या लागवडीत इतिहासात प्रथमच मोठी वाढ झाली असून सुमारे चारशे हेक्‍टर क्षेत्रात आल्याची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. तर पोषक वातावरणामुळे आले पिकाची उगवण देखील चांगल्या प्रमाणात झाली आहे. 

ऊस शेतीत आमूलाग्र बदल झाला आहे. शेतकरी आता नवीन आठ हजार पाच, दहा हजार एक, निरा 86032, को. 365 जातीचे बियाणे वापरून उत्पन्नात वाढ घेताना दिसत आहे. तर आडसाली उसासाठी को-86032 वाणाचीच शेतकऱ्यांनी जादा पसंती आहे. अशा रीतीने शेतकऱ्यांची आधुनिक पद्धतीने शेती करून प्रगतीकडे वाटचाल सुरु आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com