दहा टक्के आरक्षणातून मराठा समाजाला वगळले : पृथ्वीराज चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

जे आरक्षण देण्यात आले आहे. ते नक्की कोणाला दिले याचा खुलासा नाही. मराठा समाजाला 16 टक्के देणार आहोत. असे गृहीत धरून घेतलेला निर्णयाबाबत जनता आता जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. - माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण

कऱ्हाड : केंद्र सरकारने आर्थिक दुर्बलांना दहा टक्के आरक्षण दिले आहे. मात्र या आरक्षणातून मराठा समाजाला वगळण्यात आले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे, अशी टिका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली. 

ते म्हणाले, 'जे आरक्षण देण्यात आले आहे. ते नक्की कोणाला दिले याचा खुलासा नाही. मराठा समाजाला 16 टक्के देणार आहोत. असे गृहीत धरून घेतलेला निर्णयाबाबत जनता आता जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. उच्च वर्णीय आर्थिक निकष नक्की कोणाला याबाबतही स्पष्टीकरण नाही. ही संभ्रावस्था आहे. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची उंची सरदार पटेल यांच्या पुतळ्यापेक्षा कमी असावी असे सरकारला वाटते. अशी आमची शंका आहे. त्याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा.'

 

Web Title: Prohibit the Maratha community by ten percent reservation says Prithviraj Chavan