वाकडी घटनेचा सर्वपक्षीय, जातीय, सामाजीक संघटनांकडून निषेध

चंद्रकांत देवकते
गुरुवार, 21 जून 2018

मोहोळ(सोलापूर) - विहीरीत पोहायला गेलेल्या अल्पवयीन मुलांना मारहाण करुन गावातून नग्न करून धिड कोढली होती. तसेच त्याचा व्हीडीओ व्हायरल केला होता. या प्रकरणाचा जाहीर निषेध मोहोळ येथील विविध सामाजीक संघटना, व्यापारी, राजकीय कार्यकर्ते यांच्या वतीने करण्यात आला.  

मोहोळ(सोलापूर) - विहीरीत पोहायला गेलेल्या अल्पवयीन मुलांना मारहाण करुन गावातून नग्न करून धिड कोढली होती. तसेच त्याचा व्हीडीओ व्हायरल केला होता. या प्रकरणाचा जाहीर निषेध मोहोळ येथील विविध सामाजीक संघटना, व्यापारी, राजकीय कार्यकर्ते यांच्या वतीने करण्यात आला.  

याबाबत अधिक माहिती अशी की, ता. २० जून २०१८ रोजी महाराष्ट्रातील काही सामाजिक संघटनानी वाकडी येथील निंदनीय घटनेविरोधात "महाराष्ट्र बंद" ची हाक दिली होती. तथापी यापूर्वीच सतत मोहोळ बंदच्या घटनेबाबत तालुक्यातील सर्वपक्षीय, जातीय, धर्मीय, मान्यवरांच्या उपस्थीतीत एक सामंजस्य बैठक झाली होती. त्या अनुषंगाने समाजा समाजात जातीय तेढ आणि तणाव निर्माण करणाऱ्या अप्रवृत्तीस खतपाणी न घालता आपल्या देशाची अखंडता, एकता, बंधूत्व व सामाजिक न्याय अबाधित राखण्यासाठी एकजूटीने व एक विचाराने निर्धार करुन यापुढे कधीही मोहोळ बंद न करता सर्व समाजातील बांधवांनी एकत्र येवून अशा प्रवृत्तीच्या सामुहिक मुकाबला करण्याचा निर्धार व जाहीर निषेध व्यक्त करण्याचा निर्णय घेतलेला होता.

त्याचाच एक भाग म्हणून मौजे वाकडी येथील या निंदनीय घटनेचा मोहोळ तालुक्यातील सर्व जनता, सर्व पक्ष - संघटना, सर्व व्यापारी - उद्योजक इत्यादीनी जाहीर निषेध करून अशा अघटित व अप्रिय घटना घडू नयेत यासाठी शासनाने कठोरातील कठोर शिक्षा करण्यासाठी नवा कायदा करण्यात यावा अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री, तहसीलदार साहेब मोहोळ व मोहोळ पोलिस स्टेशनचे प्रभारी पो. नि. श्री. बडाख साहेब यांचे मार्फत देण्यात आले.
 

Web Title: Prohibition by the all-party social organizations of the wakdi incident