सोलापूर शहर महिला काॅग्रेच्या वतीने "प्रोजेक्ट शक्ती"उपक्रमाची सुरवात      

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

सोलापुर : सोलापुर शहर महिला काँग्रेसच्या वतीने प्रोजेक्ट शक्ती उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. अ.भा.महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुस्मिता देव आणि  प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अँड.चारुलता टोकस यांच्या आदेशानुसार,माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे  व आ.प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला अध्यक्षा हेमाताई चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली   या उपक्रमाचा शुभारंभ काँग्रेस भवन येथे झाला.

काँग्रेसचे  अध्यक्ष .राहुल गांधी यांनी महिलांच्या सन्मानार्थ प्रोजेक्ट शक्ती या नांवाने अनोखा उपक्रम सुरु केला आहे. उपक्रमाचा उद्देश भारतातिल महिलांना सन्मान मिळावा,विकासाच्या प्रवाहात त्यांनाही सामावून घ्यावे,देशाच्या राजकारणांत त्यांच्याही विचारांना स्थान मिळावे व त्यांची मतेही निर्णायक ठरण्यांसाठी या उपक्रमाची संकल्पना आहे. या प्रोजेक्ट शक्तीने  राहुल गांधी यांच्याशी अॅप नंबरच्या माध्यमातून संवाद साधून आपली मते त्यांच्यापर्यत पोहोचवू शकणार आहेत. अशी माहिती चिंचोळकर यांनी दिली .                 

अँड.करिमुन्निसा बागवान यांनी प्रास्ताविक केले. माजी महापौर नलिनी चंदेले,नगरसेविका अनुराधा काटकर,फिरदोश पटेल यांनी मार्गदर्शन केले.सुत्रसंचालन शिल्पा चांदणे यांनी केले तर आभार  सचिवा सुमन जाधव यांनी मानले. या  बैठकीस भारती इप्पलपल्ली,प्रमिला तुपलवंडे,विणा देवकते,अँड उमा पार्सेकर,लता गुंडला,बेगमबी शेख,रविप्रभा लोंढे,आयेशा शेख,मुमताज मनियार,शमा सय्यद,मुमताज तांबोळी,पार्वती उपासे,पद्मावती गज्जम,भाग्यश्री इब्रापुरे,जुलेखा बिजापुरे,नीरा बनसोडे,परविन शेख,रतन डोळसे,छाया पोला,उमा केत,विमल जाधव,लता सोनकांबळे,भाग्यश्री कदम,सुनिता उमगळे,रुकियाबानो बिराजदार,नंदा कांगरे,शारदा शिंदे,अनिता भालेराव,मीनाक्षी बंकापुरे,रोशन पठाण,प्रणोती जाधव,अमीबा अन्सारी,सुनिता व्हटकर,तुळसाबाई थोरात,कल्पना कांबळे,कुलसुंबी करणकोटा,चंद्रभागा उमगळे आदि पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Web Title: project shakti starts by solapur city woman congress