'साडेचार हजार कोटी रूपयांचे प्रकल्प मंजूर'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हयात साडेचार हजार कोटी रूपयांचे प्रकल्प आणि 430 कोटी रूपये रस्त्यासाठी मंजूर करून आणले आहेत. दिल्ली दरबारी कोल्हापूरचं नाव उंचावलं असून, या जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.कागल तालुक्‍यातील विविध विकासकामांच्या उदघाटन समारंभात ते बोलत होते. 

खासदार धनंजय महाडिक यांनी खासदार फंडातून कागल तालुक्‍यातील सोनगे येथे दहा लाख रूपये मंजूर केले. त्यातून गावात बनवलेला रस्ता आणि शाळेसाठी उभारलेली किचनशेड या कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. 

महाडिक म्हणाले,"साडेचार हजार कोटी रूपयांचे कोकण रेल्वे आणि कोल्हापूर विमानतळ हे प्रकल्प लवकरच पूर्णत्वास जातील. तर जिल्हयातील रस्त्यांसाठी 430 कोटी रूपये मंजूर केले आहेत. कोल्हापूर रेल्वे स्थानकासाठी 18 कोटी रूपये आणले असून, प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा दिल्या जातील.' 

कार्यक्रमाला सरपंच राणी कांबळे, उपसरपंच प्रल्हाद देवडकर,नारायण ढोले,शशिकांत जाधव,बाळासो लोंढे, विनायक भोसले, जालिंदर लगारे उपस्थित होते. दरम्यान, कागल तालुक्‍यतील बानगे येथील विठ्ठल मंदिराच्या आवारात खासदार महाडिक यांच्या फंडातून पेव्हिंग्ज ब्लॉक बसवण्यात आले. बेनिक्रे येथील विकासकामांचेही उद्‌घाटन श्री. महाडीक यांच्या हस्ते झाले. यावेळी संतराम पाटील, राजेंद्र सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला बाबूराव मेथे,सरपंच वंदना सावंत,उपसरपंच बाळासो सावंत,मोहन पाटील,अशोक पाटील,पांडुरंग कदम, रमेश सावंत,महादेव पाटील, जनार्दन पाटील उपस्थित होते.

Web Title: Projects worth Rs. 4.5 crores approved