सांगली जिल्ह्यात पावसाची दीर्घकाल उघडीप पिकांना ठरतेय मारक 

विष्णू मोहिते
Tuesday, 28 July 2020

सांगली,  ः जिल्ह्यात गेली दहा-बारा दिवसाहून अधिक काळ पावसाची उघडीप पिकवाढीच्या काळात मारक ठरते आहे. सोयाबिन, भूईमूग फुलोरा अवस्थेत असल्यामुळे सध्या पावसाची गरज आहे. जिल्ह्यात गुरुवारपासून दोन दिवस हलक्‍या पाऊस दाखवला आहे. यामुले पिकांना जीवदान मिळेल, अशी परस्थिती नसल्याचेच चित्र आहे. बागायती पिके मात्र सध्या जोमात आहेत. 

खरीप हंगामातील पिके सध्या वाढीच्या अवस्थेत आहेत. याच वेळी आगाप पिके फुलोरा तर भरण्याच्या स्थितीत तर मागास पिके फुलोऱ्यात येण्याच्या परस्थितीत आहेत. या काळात जमिनीत पुरेसा ओलाव्याची गरज असते. नेमकी याच पिक वाढीच्या स्थितीत गेली दहा-बारा दिवस सांगली जिल्ह्यात पावसाने उघडीप दिलेली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात फक्त वाळवा तालुक्‍यात हलक्‍या पावसाची नोंद झाली असून इतर सर्व तालुक्‍यात पावसाने उघडीप दिली आहे. वारणा धरणात 22.48 टी. एम. सी. तर कोयना धरणामध्ये 51.50 टी. एम. सी पाणीसाठा आहे. अलमट्टी धरणात 87.22 टी.एम.सी. पाणीसाठा आहे. 

सांगली जिल्ह्यात खरीप हंगामात आजअखेर 94 टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. यंदा मक्का, सोयाबीन, मक्‍यासह कडधान्यांची लागवड मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. शेतकऱ्यांना अशा आवर्षण प्रवण स्थितीत 31 जुलैपर्यंतच्या पिक विमा योजनेत सहभागी होवून नुकसानीला हातभार लागेल, काय याचा विचार केला पाहिजे. 
.................... 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prolonged exposure to rains in Sangli district is fatal to crops

फोटो गॅलरी