#mynewspapervendor : पैशाच्या योग्य नियोजनातून जगता येते आनंदी आयुष्य

परशुराम कोकणे
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

सोलापूर : गरिबी आहे म्हणून रडत बसण्यापेक्षा कष्टातून मिळणाऱ्या पैशांचे योग्य नियोजन केल्यास आनंदी आणि समाधानी जीवन जगता येते, हे आपल्याला गेल्या 40 वर्षांपासून वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करणारे राचप्पा आळंगे यांच्याकडे पाहिल्यावर लक्षात येतं. आळंगे यांनी वृत्तपत्र विक्रीच्या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशांचे योग्य नियोजन करून मुलगा मल्लिकार्जुन यास चांगले शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले आहे. मुलगा मल्लिकार्जुन हा आज अमेरिकेतील सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरीला आहे. 

आळंगे हे होटगी रोड, आसरा चौक, जुळे सोलापूर, विजयपूर रस्ता परिसरात वृत्तपत्र वितरित करतात. आळंगे यांनी पत्नी गुरुदेवी यांच्या मदतीने मुलास संस्कारक्षम घडविले. चांगले शिक्षण दिले. मल्लिकार्जुन यांचे महाविद्यालयीन शिक्षण संगमेश्‍वर आणि वालचंद महाविद्यालय झाले आहे. बीसीए शिक्षण घेतलेल्या मल्लिकार्जुन हे 2014 मध्ये नोकरीसाठी अमेरिकेत गेले. अधूनमधून ते मायदेशी येत असतात. अमेरिकेत सॉफ्टवेअर कंपनीमध्ये ते नोकरीला आहेत. 

मुलगा मल्लिकार्जुन हा रोज सकाळी आणि सायंकाळी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आई-वडिलांशी संवाद साधत असतो. मुलाला चांगले शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केल्याबद्दल समाजातून आळंगे कुटुंबीयांचे कौतुक होत आहे. 

एकच व्यवसाय मन लावून केला तर आयुष्यात यश गाठता येते. आयुष्यात पैशाचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. पैसा कमावण्यासोबतच त्याच्या नियोजनावरही लक्ष द्यायला हवे, असा मौलिक सल्ला वृत्तपत्र विक्रेते राचप्पा आळंगे यांनी दिला आहे.  

आई-वडिलांनी चांगले शिक्षण देऊन मला घडविले. बाबांसोबतही अनेक घरोघरी पेपर टाकले आहेत. वृत्तपत्र विक्रेत्याला सुटी मिळत नाही. पहाटे लवकर उठावे लागते. या व्यवसायात खूपच कष्ट आहेत. 
- मल्लिकार्जुन आळंगे, अमेरिका

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: proper planning of money will get good life