घरपट्टी वसुलीसाठी जप्तीपूर्व नोटिसा आघाडीच्या नेत्यांचेच पाप 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

इस्लामपूर - शहरातील मालमत्ताधारकांना घरपट्टी वसुलीसाठी जप्तीपूर्व नोटिसा पाठवणे हे सध्याच्या विकास आघाडीच्या नेत्यांचेच पाप आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे पालिकेतील गटनेते संजय कोरे आणि उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांनी केली आहे. नागरिकांनी एकही रुपया घरपट्टी भरू नका, असे आवाहन याच नेत्यांनी विरोधी पक्षात असताना केले होते, असे त्यांनी पत्रकात म्हटले आहे. 

चार दिवसांपूर्वी नगरसेवक विक्रम पाटील यांनी राष्ट्रवादीच्या या पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांवर टीका करत साठ टक्‍के जादा दराने करवाढ होण्याला राष्ट्रवादीला जबाबदार धरले होते. त्यावर श्री. कोरे व श्री. पाटील यांनी तोंड उघडले आहे. पत्रकात म्हटले आहे, "राष्ट्रवादीने सत्तेत असताना 29 मार्च 2016 ला मालमत्ताधारकांना अपील करण्याची संधी देण्याचा ठराव मंजूर केला. बेछुट आरोप करणाऱ्यांनी वस्तुस्थिती जाणून घेण्याची तसदी घ्यावी. 1995 मिळकतधारकांना 50 टक्के रक्कम भरून अपील करण्याचे आवाहन केले होते. 31 मार्च 2016 अखेर 409 जणांनी अपील दाखल केले. त्यावर सुनावणी घेण्यासाठी 7 मे 16 रोजी प्रांतांनी सूचना केली होती. संबंधित विषयासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना काय आहेत यावर अभिप्राय मागितला होता. पालिकेने 30 फेब्रुवारी 2017 ला उत्तर पाठवले आहे. त्यामुळे मिळतकतधारकांना 30 दिवसांत अपिलाची संधी मिळाली नाही. पालिका क्षेत्राची मालमत्ता आकारणीसाठी 4 झोन आहेत. अंदाजे 4100 मालमत्ताधारकांच्या संकलित आकारणीवर झोन क्रमांक एक मध्ये 50 टक्के, दोन मध्ये 60 टक्के, तीन व चार मध्ये 55 टक्के कर सवलती देऊन त्याची पूर्तता देखील केली आहे. उर्वरित 1995 जणांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादीकडून योग्य स्तरावर पाठपुरावा केला जाईल. केवळ सवंग प्रसिद्धीसाठी संबंधितांनी शहरातील जनतेची दिशाभूल करू नये.' 

Web Title: property tax collection