येरळा नदी वरील वाझर बंधाऱ्याचे संरक्षण खांब कोसळले 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 October 2020

वाझर ( ता.खानापूर ) येथील येरळा नदी वरील बंधाऱ्याचे लोखंडी खांब पूरामुळे कोसळले आहेत. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी खांबांची पुर्वत जोडणी करावी, अशी मागणी आहे. 

आळसंद (सांगली) : वाझर ( ता.खानापूर ) येथील येरळा नदी वरील बंधाऱ्याचे लोखंडी खांब पूरामुळे कोसळले आहेत. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी खांबांची पुर्वत जोडणी करावी, अशी मागणी आहे. 

आठ दिवसांपूर्वी येरळानदी मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे बंधार्यावरील संरक्षक लोखंडी खांब कोसळले आहेत. खानापूर - पलूस तालुक्‍यांना वाझर मार्गे जाण्याचा मार्ग आहे. वाझर - आंधळी ला जाण्याचा मार्ग आहे. दुचाकी - चारचाकी वाहन धारकांची मोठी रहदारी असते. बंधाऱ्यावरील खांब कोसळल्याने वाहतूक मंदावली आहे. 

आमदार अनिल बाबर यांनी चार दिवसांपूर्वी अवकाळी पाहणी करण्यासाठी आले असता बंधाऱ्याला स्वयंचलित दरवाजे व संरक्षक लोखंडी खांब जोडण्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले होते. अजून खांब जोडलेले नाहीत. त्वरीत खांब जोडावेत. अशी मागणी आहे. 

" येरळा नदीला आलेल्या पूरामुळे वाझर बंधारा पाण्याखाली गेला होता. बंधाऱ्यावरील संरक्षक खांब कोसळले आहेत. ते जोडावेत. अशी मागणी आमदार अनिल बाबर यांच्या कडे केली आहे. " 
संजय जाधव, सरपंच वाझर (ता.खानापूर ) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The protection pillar of the Wazer Dam on the Yerla River collapsed