मंगळवेेढ्यात नववर्षाची सुरवातच संपाने

हुकूम मुलाणी 
मंगळवार, 1 जानेवारी 2019

मंगळवेढा : राज्यात नगरपालिका कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याने आज नवीन वर्षातील पहिल्याच दिवशी काम बंद असल्याने या संपाचा फटका मात्र सर्व सामान्य नागरिकांना बसणार आहे.

मंगळवेढा : राज्यात नगरपालिका कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याने आज नवीन वर्षातील पहिल्याच दिवशी काम बंद असल्याने या संपाचा फटका मात्र सर्व सामान्य नागरिकांना बसणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील 60 नगर परिषदांमधील कर्मचाऱ्यांचा मेळावा मंगळवेढ्यात घेण्यात आला, त्यावेळीच त्याच्या मागण्यासाठी संपावर जाण्याचा इशारा यांनी महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी समन्वय समितीचे अध्यक्ष कॉ. डी.एल. कराड यांनी दिला होता. पण याकडे लक्ष न दिल्याने अखेर हा निर्णय न.पा.कर्मचाऱ्यांनी घेतला. यामध्ये कर्मचार्‍यांचा सातवा वेतन त्वरीत लागू करावा, 24 वर्षांची आश्वासीत प्रगती योजना लागू करावी. 

नगरपरिषद रोजंदारी, कंत्राटी, हंगामी कर्मचारी यांना विनाअट कायम करण्यात यावे, यांसह 27 मागण्यांचा यात समावेश आहे. मंगळवेढा नगरपालिकेत मुख्‍याधिकारी पल्‍लवी पाटील यांना न. पा. कर्मचाऱ्यांनी याबाबतचे निवेदन दिले. यावेळी कार्याध्यक्ष रामभाऊ पवार, दिलीप मुढे, विनोद सर्वगोड, हरिप्रसाद देवकर, दिनेश रजपूत, सिद्धेश्वर माळी, बाबासाहेब पवार, बसवेश्वर लंगोटे, सतीश जाधव, दत्तात्रय ढोणे, विठ्ठल कांबळे, बाळू जाधव, तुकाराम गोवे,  नागेश राजमाने, गोरख काकडे,  गणेश माळी, शंकर देवकर, बंडोपंत मणेरी, शंकर वस्त्रे आदीं कर्मचार्‍यांनी उपस्थित होते. 

Web Title: Protest at the beginning of New Year in the Mangalvedha