पालकमंत्री राम शिंदेंच्या वक्तव्याचा भुमिपुत्र शेतकरी संघटनेचा निषेध

सनी सोनावळे:
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

टाकळी ढोकेश्वर : राज्याचे जलासंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रा. राम शिंदे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांबद्दल केलेल्या "जनावरांना चारा नसेल तर पाहुण्यांकडे नेऊन घाला" या वादग्रस्त वक्तव्याचा भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला असल्याचे भुमिपुत्र शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल देठे यांनी सांगितले.

टाकळी ढोकेश्वर : राज्याचे जलासंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रा. राम शिंदे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांबद्दल केलेल्या "जनावरांना चारा नसेल तर पाहुण्यांकडे नेऊन घाला" या वादग्रस्त वक्तव्याचा भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला असल्याचे भुमिपुत्र शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल देठे यांनी सांगितले.

याबाबत देठे म्हणाले की, ''राज्यात नगर जिल्ह्यासह बहुतांश जिल्ह्यात सरकारने दुष्काळ जाहीर करून दिड - दोन महिने होत आलेले आहेत. परंतु अद्यापही दुष्काळावर उपायोजना सरकारच्यावतीने करण्यात आलेल्या नाहीत. त्या पार्श्वभूमीवर ''पाथर्डी पालिकेच्या हद्दीत येणाऱ्या गावांसाठी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या छावण्या व रोजगार हमीचे कामे सुरु करण्यात याव्यात'' ,या मागणीसाठी नगरसेवक रमेश गोरे यांनी शिंदे यांना निवेदन दिले. त्यावेळी यांनी ''जनावरांना चारा नसेल तर पाहुण्यांकडे नेऊन घाला'' असा अजब सल्ला देऊन शेतकरी बांधवांचा अपमान केला असुन त्यांच्या या वक्तव्याचा संघटनेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

नगर जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला असुन, या तालुक्यांमध्ये जनावरांना चारा, पाणी मिळणे कठीण झाले असल्याने बहुतांश जनावरे शेतकऱ्यांनी विकली आहेत तर, उर्वरित जनावरे जगवण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. तसेच, नागरिकांनाही सरकारने रोजगार उपलब्ध करून दिलेला नसल्याने नागरिकांनाही आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. अशा गंभीर परिस्थितीत सरकारने दुष्काळावर उपाययोजना करण्याऐवजी सरकारमधील जबाबदार मंत्री मात्र शेतकऱ्यांना उलट अजब सल्ले देऊन शेतकऱ्यांच्या भावनांचा गांभीर्याने विचार न करता त्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचेच काम करत आहेत. त्यामुळे त्यांनी तात्काळ तमाम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची माफी मागुन दुष्काळी भागात तातडीने उपाययोजना कराव्यात नाही तर, सत्ता सोडावी ,असेही देठे पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.

Web Title: The protest of the Bhoomiputra Farmer's Association Guardian Minister Ram Shinde's remarks