राईनपाडा हत्याकांड निषेधार्थ नेवाशात मोर्चा

सुनील गर्जे
गुरुवार, 5 जुलै 2018

धुळे जिल्ह्यातील राईनपाडा (ता. साक्री) येथे डवरी गोसावी समाजाच्या पाच भिक्षेकर्यांच्या निर्घुण हत्येच्या निषेधार्ध नाथपंथी डवरी गोसावी समाज संघटनेच्या वतीने गुरुवार (ता. 5) रोजी नेवासे तहसील कार्येलायावर मोर्चा काढण्यात आला.
 

नेवासे : धुळे जिल्ह्यातील राईनपाडा (ता. साक्री) येथे डवरी गोसावी समाजाच्या पाच भिक्षेकर्यांच्या निर्घुण हत्येच्या निषेधार्ध नाथपंथी डवरी गोसावी समाज संघटनेच्या वतीने गुरुवार (ता. 5) रोजी नेवासे तहसील कार्येलायावर मोर्चा काढण्यात आला.

या हत्याप्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देवून मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांचे तत्काळ पुनर्वसन करा, त्यांच्या कुटुंबियातील एका व्यक्तीचा सरकारी नोकरीत समावेश करा, हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, भिक्षुकी करणार्या समाजातील व्यक्तींना शासनाचे ओळख पत्र द्या यासह आदी मागण्यासाठी नाथपंथी डवरी गोसावी समाज संघटनेच्यावतीने अध्यक्ष दयाराम सावंत, उपाध्यक्ष उत्तम सावंत, काशिनाथ चौगुले यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

नेवासे पंचायत समिती आवारातून घटनेच्या निषेधाच्या घोषणा देत मोर्चास प्रारंभ झाला. तहसील कार्येलायाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर झालेल्या निषेध सभा झाली. यावेळी समाजाचे नेते मोहन शेगर, आप्पा सावंत, पिराजी शिंदे, विठ्ठल शेगर, उत्तम शिंदे, शिवाजी शेगर यांची भाषणे झाली.

तहसीलदार उमेश पाटील, नायब तहसीलदार ज्योतीप्रकाश जायकर, पोलीस उपनिरीक्षक सुनील सुर्यवंशी यांनी मोर्चेकर्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी मोर्चात शेकडो डवरी गोसावी समाजबांधव सहभागी झाले होते.

Web Title: protest in nevasa for rainpada incident