राहुरी-शनिशिंगणापुर मार्गावर पाण्यासाठी ग्रामस्थांचे रास्तारोको; भाविकांचा खोळंबा  

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जुलै 2019

सोनईसह अठरा गावातील पिण्याच्या पाण्याची योजना सुरु होण्याकरीता राहुरी-शनिशिंगणापुर मार्गावर आज दोन तास रास्तारोको आंदोलन झाले. या आंदोलनासाठी हजारो महिला हंडा घेवून उपस्थित होत्या.

सोनई : सोनईसह अठरा गावातील पिण्याच्या पाण्याची योजना सुरु होण्याकरीता राहुरी-शनिशिंगणापुर मार्गावर आज दोन तास रास्तारोको 
आंदोलन झाले. या आंदोलनासाठी हजारो महिला हंडा घेवून उपस्थित होत्या. सोनईसह खेडले, करजगाव, खरवंडी, शिरेगाव,तामसवाडी सहवाड्यावस्त्यांचा यात समावेश आहे.

८५ कोटी रुपये खर्चाची ही योजना एक सवर्षापासून सुरु झाली, मात्र ही योजना सलग महिनाभर कधीच सुरु राहिली नाही. योजना हस्तांतरण व कामगारांच्या पगारावरुन योजनेला साडेसातीचा फेरा लागला आहे. आठ दिवसांपासून पाणी बंद झाल्याने आज दहा वाजता राहुरी रस्त्यावरील बेल्हेकरवाडी फाटा येथे अठरा गावातील ग्रामस्थ ठाण मांडून बसले. महिला हंडा, बादल्या, ड्रम घेवून रस्त्यावर बसल्या. माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन झाले. मुकुंद भोगे, जयवंत लिपाने, खलील इनामदार, संजय जंगले, डॉ.रामनाथ बडे, शरद आरगडे, शरद जाधव यांचे भाषण झाले. सर्वांनी विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यावर जाहीर आरोप केला.

आज शनिवार असल्याने दोन तासाच्या रास्तारोकोमुळे शनिभक्तांची मोठ्या प्रमाणात अडचण झाली. पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता. माजी आमदार गडाख यांनी या योजनेसाठी केलेले प्रयत्न सांगून आमदार मुरकुटे यांच्या निष्क्रियते मुळेच ही योजना बंद पडली असा जाहीर आरोप केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: protest by villagers on the Rahuri-Shani Shingnapur road for water

टॅग्स