मुलींवरील अत्याचाराच्या विरोधात मोहोळमध्ये सर्वधर्मीय मूक मोर्चा

चंद्रकांत देवकते
बुधवार, 18 एप्रिल 2018

मोहोळ (जि. सोलापूर) : जम्मू काश्मीरमधील कठुआ येथे असिफा या लहान मुलीवर झालेला अत्याचार, तसेच उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये  झालेल्या महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ येथील मुस्लिम समाजाच्या वतीने सर्व धर्मियांना बरोबर घेऊन मूक मोर्चा काढण्यात आला.

या मूक मोर्चात सर्व जातीधर्माचे लोक ,लहान मुली, मुले सहभागी झाले होते. लहान मुलींवर पाशवी अत्याचार करणाऱ्या नराधमांना त्वरित फाशीची शिक्षा द्यावी , वारंवार होणाऱ्या अशा अत्याचाराला प्रतिबंद घालण्यासाठी कायद्यामध्ये कठोर तरतूद करावी असे निवेदन या मूक मोर्चाच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले.

आदर्श चौक महिबुब सुबहानी दर्ग्यापासुन निघालेला हा भव्य मोर्चा आंबेडकर चौक , गवत्या मारुती चौक, बागवान चौक, बुधवार पेठ, शिवाजी चौकातून तहसील कार्यालयामध्ये आला.

यावेळी दिपक गायकवाड, अॅड विनोद कांबळे, नगराध्यक्ष रमेश बारसकर, सिमाताई पाटील, हणमंत कसबे, शाहीन शेख मॅडम आदीनी  मनोगत व्यक्त करीत सदर घटनेचा निषेध व्यक्त केला.

अत्याचाराला धर्माचे व जातीचे कवच न देता देशहित लक्षात घेऊन अशा  प्रवृत्तींना कठोरात कठोर शासन मिळणे गरजेचे आहे . अशी अपेक्षा यावेळी अनेकांनी  व्यक्त केली .  या मोर्चात सर्वश्री नगराध्यक्ष रमेश बारसकर, उपनगराध्यक्ष शौकत तलफदार, शिवसेना तालुका प्रमुख काका देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिपक गायकवाड, माजी उपसभापती शहाजहान शेख, भिम युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड विनोद कांबळे,  अॅड सुचिता हिवरे, अॅड शमशाद मुलाणी, अॅड हाजीमलंग शेख, यशोदा  कांबळे,  गौतम खरात, नगरसेवक बापु डोके, अतुल गावडे, सत्यवान देशमुख, सिमाताई पाटील,  शाहीन शेख, हेमंत गरड, तन्वीर शेख, जिब्राईल शेख, संतोष गायकवाड, दिनेश घागरे, रणजित गायकवाड, विकी देशमुख, नागेश वनकळसे, नागेश पुराणीक,  एम आय एम चे बिलाल शेख, माजी सरपंच अशोक देशमुख, बिलाल कुतुबुद्दीन  शेख,  इलियास शेख, डॉ वसीम शेख, डॉ खान,रफीक हरणमारे, इन्नुस शेख, इम्रान शेख, राजू सुतार, राजू रसाळ, एजाज तलफदार, हणमंत कसबे,  आदी सह बहुसंख्य समाजबांधव उपस्थीत होते .

Web Title: protests against Kathua rape in Mohol