कऱ्हाडच्या मुख्याधिकाऱ्यांच्या प्रतिमेला हार घालून निषेधाची श्रद्धांजली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

कऱ्हाड पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांची प्रतिकात्मक कबर बांधून त्यांच्या प्रतिमेला हार घालून निषेध करण्यात आला.

कऱ्हाड : कऱ्हाड पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांची प्रतिकात्मक कबर बांधून त्यांच्या प्रतिमेला हार घालून निषेध करण्यात आला.

अज्ञात व्यक्तींनी केलेल्या कृत्याने खळबळ उडाली आहे. येथील मंगळवार पेठेतील पांढरीच्या मारूती मंदीर परिसरात सकाळी घटना सकाळी उघडकीस आली. पालिकेच्या कर्मचाऱ्य्ंनी ते छायाचित्र तेथून हटवले. तोपर्यंत त्याचा व्हिडीओ व छायाचित्रे सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. पालिकेच्या येथील ड्रेनेज योजनेच्या कामासाठी काढलेल्या खड्ड्यात पडून एकाचा कालच मृत्यू झाला आहे. त्याचे तीव्र पडसाद काल उमटले.

दरम्यान, त्यानंतर काल रात्री येथील मंगळवार पेठेत एका वळणावर असाच खड्डा काढण्यात आला होता. तो कमी उंचीचा होता. मात्र त्यातही दुचाकीस्वार व सायकलस्वार पडले. त्यामुळे संतप्त नागरीकांनी काल रात्रीच जेसीबीने आहे. त्या स्थितीत खड्डा भरला होता. त्यानंतर त्याच खड्ड्यावर अज्ञात व्यक्तीने भरलेल्या खड्ड्याला मुख्याधिकारी यांची प्रतिकात्मक कबर करण्यात आली. कबरीवर मुख्याधिकारी डांगे यांचे छायाचित्र लावून त्याला पुष्पहार घालण्यात आला. अज्ञात व्यक्तीच्या कृत्याने खळबळ उडाली आहे. सकाळी पालिका आरोग्य कर्मचारी घटनास्थळी पोचले व त्यांनी तो बोर्ड काढून टाकला..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: protests by wearing a necklace to the head of the headquarters