सिद्धापूर येथील वीज उपकेंद्रासाठी तीन कोटींची तरतूद

हुकूम मुलाणी
बुधवार, 5 डिसेंबर 2018

मंगळवेढा - सिद्धापूर येथील वीज उपकेंद्रासाठी एच.व्ही.डी.एस. योजनेतून तीन कोटी रुपयेची तरतूद केली आहे. हे काम मार्च अखेर पूर्ण केले जाणार असून, तळसंगी नंदूर व शिरशी येथे नवीन वीज उपकेंद्रासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती भारत भालके यांनी दिली.

पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील इन्फ्रा-2 च्या प्रलंबित कामे व शेतकर्‍यांच्या वीजेच्या प्रलंबित प्रश्नाबाबत आवाज उठविला. त्यानुसार ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी मुख्य अभियंत्यासोबत बैठकीच्या सुचना दिल्याप्रमाणे पंढरपूर येथे वीज समस्यांसंदर्भात बैठक झाली.  

यावेळी मुख्य अभियंता सुनिल पावडे, अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, पंढरपूरचे कार्यकारी अभियंता साहेब नारायण व्हनमाने, अतिरिक्त कार्यकारी अभियंता नंदकुमार सोनंदकर, उप कार्यकारी अभियंता संजय शिंदे, हेमंत कासार आदी उपस्थित होते. 

यावेळी भालके यांनी मंगळवेढा तालुक्यातील बोराळे उपकेंद्रा आंतर्गत नदीकाठावरील शेतकऱयांना अपुरा व कमी दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याने सिद्धापूर येथे नवीन उपकेंद्राच्या मागणीची दखल घेत तेथे नवीन उपकेंद्राचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी तीन कोटींची तरतूद केली असून, हे काम मार्च अखेर पूर्ण करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच तळसंगी येथील उपकेंद्रांचे कामदेखील मार्चअखेर होणार असून शिरशी व नंदूर येथे नवीन उपकेंद्र होण्यासाठी प्रस्ताव सादर केले आहेत. 

तालुक्यातील डीपी जळण्याचे प्रमाण जास्त आहे. येथे जुने डीपी बदलून नवीन 100 केव्हीचे डीपी द्यावेत, जुन्या जीर्ण झालेल्या लाईन बदलून देणे, केबल कट आऊट देणे, शेतकऱयांना प्रलंबित वीज जोडणी वेळेत देणे, जळालेले डीपी तत्काळ भरून देणे, तसेच महावितरण आपल्या दारी, केबल टाकून घेतलेल्या शेतकऱयांना वीज कनेक्शन देणे, एचव्हिडीएस योजनेस गती देणे, इन्फ्रा 2 ची राहिलेली कामे करने एक गाव एक दिवस मोहीम राबविणे विजेचे साहित्य त्या त्या उपकेंद्रामध्ये उपलब्ध करून देण्याची सुचना करण्यात आली.

Web Title: A provision of Rs. 3 crores for power sub station at Siddapur