लाच घेणाऱ्या पीएसआय, पोलिस नाईकाला अटक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

सोलापूर - दाखल झालेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी आठ हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणात अशोक चौक पोलिस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक केरू रामचंद्र जाधव (वय 57) आणि पोलिस नाईक संतोष रामचंद्र चव्हाण (वय 34) या दोघांना सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (मंगळवारी) दुपारच्या सुमारास अटक केली. या गुन्ह्यात पोलिस नाईक चव्हाण यांनी पैसे स्वीकारले आहेत. 

तक्रारदार यांनी 1996 मध्ये साईबाबा चौक परिसरात जागा विकत घेतली होती. त्या जागेच्या मालकी हक्काच्या कारणावरून तक्रारदार यांचा शंकर चौगुले यांच्याशी वाद झाला होता. तक्रारदाराच्या आईने 18 फेब्रुवारी 2018 रोजी अशोक चौक पोलिस चौकीत चौगुलेविरुद्ध तक्रारी अर्ज दिला होता. त्यांच्या अर्जाची चौकशी करून गुन्हा नोंद करण्यासाठी आणि तक्रारदार यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात त्यांना मदत करण्यासाठी 20 हजारांची मागणी पोलिस उपनिरीक्षक केरू जाधव यांनी केली होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज दुपारी अशोक चौक पोलिस चौकीत सापळा लावला. तक्रारदाराकडून पोलिस उपनिरीक्षक जाधव यांच्यासाठी आठ हजार रुपये स्वीकारताना पोलिस नाईक चव्हाण यांना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Web Title: psi and police arrested in bribe case