'महिलांसह शेतमजुरांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणार'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

कोल्हापूर - महिलांसह शेतमजूरांच्या सुरक्षिततेला अग्रक्रमाने प्राधान्य देण्यावर भर राहील, असे आज करवीरचे नूतन पोलिस उपाधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सांगितले. पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

कोल्हापूर - महिलांसह शेतमजूरांच्या सुरक्षिततेला अग्रक्रमाने प्राधान्य देण्यावर भर राहील, असे आज करवीरचे नूतन पोलिस उपाधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सांगितले. पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

उपअधीक्षक पद्दोर म्हणाले, ""महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या पुढाकारातून निर्भया पथकाची स्थापना केली. महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करून देण्याला अग्रक्रम असणार आहे. त्यादृष्टीने आवश्‍यक उपाययोजनेबाबत अधिकाऱ्यांची चर्चाही केली आहे. शेतमजुरांवर होणारे अन्याय हा गंभीर विषय आहे. त्यांना आपल्या व्यथा मांडता येत नाही. अशा घटकांवर अन्याय होणार नाही यासाठी तालुकापातळीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. युवा वर्ग गुन्हेगारी अगर व्यसनापासून अलिप्त राहावा यासाठी त्यांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. कर्तव्य बजावताना याबाबतही काम केले जाईल. गुन्ह्यांसंबधीची माहिती व्हॉटस्‌ ऍप ग्रुपच्या माध्यमातून मिळविण्यासाठी युवा वर्गाची मदत घेऊ.'' 

गुन्हा सिद्धता प्रमाण वाढले पाहीजे. त्यासाठी तयार करावी लागणाऱ्या कायदेशीर कागदपत्रांबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्दर्शनपर वर्ग घेण्याचा मानस आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक तोंडावर आली आहे. यासंदर्भात सहा पोलिस ठाण्यांतील अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून शांततामय वातावरणात निवडणूक घेण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. 

दरम्यान, पद्दोन्नतीवर अमरसिंह जाधव यांची बदली झाल्यानंतर करवीर पोलिस उपाधीक्षकपदी औरंगाबद ग्रामीणचे सहायक पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची नियुक्ती झाली. आज त्यांनी पदाची सूत्रे घेतली. ते मूळचे कोलकताचे. त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ लॉमधून एलएल.बी. ही पदवी मिळवली. त्यानंतर ऑक्‍सफर्ड विद्यापीठाची एलएल.एम. पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा देऊन आयपीएस अधिकारी म्हणून पोलिस दलात दाखल झाले. त्यांनी सेवत थेट त्यांनी महाराष्ट्राला अग्रक्रम दिला. त्यानुसार 2 सप्टेंबर 2015 मध्ये त्यांनी औरंगाबाद ग्रामीणमधील वैजापूर येथे सहायक पोलिस अधीक्षकपदाची धुरा त्यांच्याकडे होती. पद्‌भार स्वीकारल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.

Web Title: PSI Harsh Poddar