हमालाचा मुलगा बनला पोलिस उपनिरीक्षक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

आपटी - हमाली करणाऱ्या दिलीप रणभिसे यांचा मुलगा रवींद्र दिलीप रणभिसे याने राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत यश संपादन करून खाकी वर्दी परिधान करण्याचे स्वप्न साकार केले आहे.

त्याच्या या यशाबद्दल ग्रामस्थांनी गावातून मिरवणूक काढून कौतुक केले. रवींद्र रणभिसे याची घरची परिस्थिती तशी बेताची. वडिलांनी हमाली काम व आईने मोलमजुरी करून आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्याची जिद्द ठेवली.

परिस्थितीमुळे छोट्या-मोठ्या नोकऱ्या करत बहिस्थ विद्यार्थी म्हणून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. शासकीय सेवेत करिअर करायचे ध्येय ठेवून चार वर्षे सातत्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला.

Web Title: PSI Ravindra Ranbhise Success Motivation