मोहोळ विधानसभा मतदारसंघात जनजागृती मोहिम

राजकुमार शहा 
रविवार, 23 डिसेंबर 2018

मोहोळ : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुक आयोगाने ईव्हीएम व व्हीव्ही पॅट यंत्राच्या प्रशिक्षण, प्रसार व जनजागृतीबाबत दिलेल्या निर्देशानुसार मोहोळ  तहसील कार्यालयाच्या वतीने मोहोळ विधानसभा मतदारसंघात जनजागृती मोहिम हाती घेण्यात आली असून आजपर्यंत आठरा गावात जनजाग्रती करण्यात आल्याची  माहिती तहसीलदार जीवन बनसोडे यांनी दिली .
 
सोमवार ता 17 पासुन ही मोहीम सुरू झाली असुन ती 31 डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे . दोन पथकाच्या माध्यमातुन एकुण 14 कर्मचाऱ्यांची यासाठी नेमणुक करण्यात आली आहे .पथकास जनजागृतीसाठी कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट ,पोस्टर , बॅनर , माईक , स्पीकर व इतर साहित्य देण्यात आले आहे. दैनंदिन जनजागृती झाल्यावर सदरचे साहित्य तहसील कार्यालयातील सुरक्षा कक्षात सिलबंद करण्यात येणार आहे . या मोहिमेच्या जनजागृतीसाठी प्रत्येक गावात दवंडीचे आयोजन ही करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नागरीकांनी या मोहिमेत सहभाग नोंदवावा असे अवाहन निवडणुक नायब तहसिल दार श्री लिंबारे यांनी केले आहे .

Web Title: Public awareness campaign in Mohol Vidhan Sabha constituency