नगर - कुकाण्यात सार्वजनिक शौचालय गेले चोरीला

सुनील गर्जे 
बुधवार, 4 जुलै 2018

नेवासे (नगर) : कुकाणे (ता. नेवासे) येथील बसथंबा परिसरातील एकमेव असलेली सार्वजनिक शौचालय (मुतारी) सोमवारी मध्यरात्री जमीनदोस्त करून त्यावर एकाने टपरी थाटल्याने मंगवारी दिवसभर शौचालय चोरीस गेल्याची एकाच चर्चा कुकाणेकरांत रंगली होती. हेच शौचालय पाडून त्यावर पत्र्याची टपरी टाकण्याची घटना दुसर्‍यांदा घडल्याने या जागेचे नेमके गौडबंगाल काय असा प्रश ग्रामस्थांना पडला आहे.   

बेकायदा व अतिक्रमानाचे गाव म्हणून सर्वतदूर परिचितसलेल्या कुकाण्यात ग्रामपंचायतीने व्यावसायिक, प्रवासी यांच्यासाठी हजारो रुपये खर्चून कुकाणे बसथांबा परिसरात नेवासे-शेवगाव रस्त्याच्या कडेला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत दहा फुटाचे शौचालय (मुतारी) बांधले आहे. कुकाणे बसथांबा परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत स्थानिक काही पुढार्‍यांनी लाखो रुपयांचे व्यवहार करून जागा विकल्या आहे. याच परिसरात एकमेव असणारे हे शौचालय सोमवारी मध्यरात्री एकाने पाडून त्यावर पत्र्याची टपरी टाकली आहे.

दरम्यान हा दुसर्‍यांदा प्रकार घडल्याने या जागे बाबत मोठ्या 'अर्थपूर्ण' घडामोडीची शक्यता असून कुकाण्यात जागा बाळकावून अतिक्रमण करण्याचे प्रकार नेहमी रात्रीच चालत असल्याने याला नेमका आशीर्वाद कोणाचा हीही चर्चा सध्या कुकानेकरांत चालू आहे.

याच जागेचा हट्ट का?
हेच शौचालय पडून त्यावर टपरी टाकण्यामागचे नेमके 'अर्थपूर्ण' गौडबंगाल काय आहे हे कुकाणेकरांना माहीतच आहे. या जागे बाबात गेल्यावर्षीच व्यवहार झाल्याची चर्चा आहे. त्यामुळेच याच जागेचा हट्ट संबंधीताकडून होत आहे.

"बेकायदा सार्वजनिक शौचालय पाडल्या बाबत संबंधित व्यक्ति विरोधात पोलिस, महसूल विभागाकडे तक्रार केली आहे.
- रामकिसन बटुळे, ग्रामविकास अधिकारी, कुकाणे 

"ग्रामपंचायत पदाधिकार्‍याचा फोन आला होता मात्र अद्यापर्येत आमच्याकडे या प्रकरणी कोणतीही तक्रार नाही. तक्रार आल्यास कारवाई करू. 
- शैलेश ससाणे, प्रभारी, पोलिस दूरक्षेत्र, कुकाणे   
 
Web Title: public toilet stolen in kukana newase nagar