कुकाण्यातले सार्वजनिक शौचालय सापडले

सुनील गर्जे
गुरुवार, 5 जुलै 2018

कुकाणे (ता. नेवासे) येथील बसथांबा परिसरातील सार्वजनिक शौचालय (मुतारी) सोमवारी मध्यरात्री चोरीस गेल्याचे वृत्त 'सकाळ'ने प्रसिद्ध करताच आज सकाळी हे शौचालय त्याच जागेवर भूसपाट केलेल्या अवस्थेत आढळल्याने चोरीस गेलेले हे शौचालय सापडल्याची चर्चाही आज दिवसभर कुकाणेकारांत ऐकायला मिळत होती.

नेवासे : कुकाणे (ता. नेवासे) येथील बसथांबा परिसरातील सार्वजनिक शौचालय (मुतारी) सोमवारी मध्यरात्री चोरीस गेल्याचे वृत्त 'सकाळ'ने प्रसिद्ध करताच आज सकाळी हे शौचालय त्याच जागेवर भूसपाट केलेल्या अवस्थेत आढळल्याने चोरीस गेलेले हे शौचालय सापडल्याची चर्चाही आज दिवसभर कुकाणेकारांत ऐकायला मिळत होती.

कुकाणे येथील बसथंबा परिसरातील एकमेव असलेली सार्वजनिक शौचालय (मुतारी) सोमवारी मध्यरात्री जमीनदोस्त करून त्यावर एकाने टपरी थाटल्याने कुकाणे येथील सार्वजनिक शौचालय चोरीस गेल्याची एकाच चर्चा रंगली. 'सकाळ'मध्ये याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच आज संबंधिताने या जागेवरची टपरी काढून शौचालयाची जागा रिकामी केल्याने शौचालय सापडल्याची चर्चाही दिवसभर रंगली होती.

अतिक्रमन व बेकायदेशी बांधकाम मोठ्या प्रमाणात होत असलेल्या कुकाणे गावात ग्रामपंचायतीने एकूण चार शौचालये (मुतारी) बांधले आहेत. त्यातील दोनच त्यांच्या हद्दीत तर एक पोलीस व एक सार्वजनिक विभागाच्या हद्दीत आहेत. मात्र 32 खेड्याचे दैनंदिन व्यवहाराचे केंद्रबिंदू व तालुक्यात मोठी बाजारपेठ असणार्या १२-१५ हजार लोकवस्तीच्या कुकाण्यात महिलांसाठी एकही सार्वजनिक शौचालय नाही. त्यामुळे गावात विकण्यासाठी जागा उपलब्ध आहे मात्र महिलांच्या शौचालयासाठी जागा उपलब्ध होत नाही. मोठी शोकांतिका आहे.

Web Title: The public toilets were found in kukane