आमसभेच्या प्रचारार्थ फेरीने वेधले लक्ष

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 एप्रिल 2017

मराठा मावळ्यांसह रणरागिणींचा सहभाग; ‘जय भवानी जय शिवाजी’चा जयघोष
कोल्हापूर - मराठा आमसभेच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या दुचाकी फेरीने शहरवासीयांचे आज लक्ष वेधले. ‘जय भवानी जय शिवाजी’च्या जयघोषात ही फेरी काढण्यात आली. मराठा मावळ्यांसह रणरागिनींनी फेरीत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे होत असलेल्या पहिल्या मराठा आमसभेनिमित्त फेरीचे आयोजन केले होते. 

मराठा आरक्षण, मराठा भवन व मराठा आचारसंहिता यासंबंधी आमसभेत चर्चा होणार आहे. मराठा समाजाच्या विकासाची दिशा ठरविली जाणार आहे. या आमसभेत समाजातील सर्व घटकांनी सहभागी व्हावे, यासाठी दुचाकी फेरी काढण्यात आली. महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या हस्ते मंगळवार पेठेतील मराठा महासंघाच्या कार्यालयाजवळ फेरीचे उद्‌घाटन झाले.

छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी यासह मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणांत फेरीस सुरवात झाली. भगव्या नऊवारी साड्या व डोक्‍यावर फेटे बांधून महिलासुद्धा फेरीत सहभागी झाल्या. मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका, छत्रपती शिवाजी चौक, सीपीआर ते दसरा चौक असा फेरीचा मार्ग राहिला. अवधूत पाटील, शंकरराव शेळके, संदीप पाटील, प्रकाश पाटील, गौरव पाटील, अखिलेश जाधव, शिरीष जाधव, सुनील पाटील, विजय पाटील, शिवाजी मंडलिक, शैलजा भोसले, नेहा मुळीक, वैशाली नातेकर, पूजा पाटील, उषा लांडे, मीनल मुळीक फेरीत सहभागी झाले होते.

Web Title: publicity rally for maratha meeting