पुणे-बंगळूर महामार्ग आजही बंदच!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

महामार्गावरील वाहतूक ठप्पच आहे. अद्याप महामार्गावर चार ते साडेचार फूट पाणी असून, पाण्याचा वेग प्रचंड आहे. महामार्गालगत असलेली शोरूम पुराच्या पाण्यात बुडाली होती.

शिरोली (सांगली) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सांगली फाट्याजवळ आलेल्या महापुराच्या पाण्यामुळे सलग पाच दिवस महामार्ग बंद आहे. काल रात्री पाणी पातळीत सुमारे अर्ध्या फूटाने वाढ झाली होती; मात्र सकाळपर्यंत वाढलेली पाणी पातळी कमी झाली असून, पाणी पातळी स्थिर आहे.

महामार्गावरील वाहतूक ठप्पच आहे. अद्याप महामार्गावर चार ते साडेचार फूट पाणी असून, पाण्याचा वेग प्रचंड आहे. महामार्गालगत असलेली शोरूम पुराच्या पाण्यात बुडाली होती. पूराचे पाणी ओसरेल तशी शोरूम दिसू लागलेत. त्यावरून महामार्गाची पाण्याची पातळी किती कमी झाले, याचा अंदाज बांधला जात आहे.

महामार्गावरून जीवनावश्यक वस्तू व अवजड वाहतूक सुरू झाल्याची, अफवा सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे ; मात्र कोणत्याही प्रकारची वाहतूक सुरू झालेली नाही. नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Banglore high still not starts due to water level