पुणे-बंगळूर मार्ग सहाव्या दिवशी ठप्पच; वाहतुकीची ट्रायल (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

राष्ट्रीय महामार्ग ठप्प होऊन सहावा दिवस उजाडला. रस्त्यारून वाहणारे पाणी संथ गतीने कमी होत आहे. काल रात्री (ता. १० ) पासून काल सकाळ दहा पर्यत पाण्याची पातळी अर्धा ते पाऊण फूटाने कमी झाली असून, तरी आद्याप तीन ते साडे तीन फूट पाणी महामार्गावर आहे. पाण्याचा वेग प्रचंड आहे. 

शिरोली पुलाची : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक आज सहाव्या दिवशीही ठप्प राहणार असून, महामार्गावरील वाहतूक उद्या (ता. 12) सुरू होण्याची शक्यता जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांनी व्यक्त केली. 

महामार्गावरील पूर्ण पाणी ओसरल्याशिवाय वाहतूक सुरू होणार नसून, अत्यावश्यक सेवा कोल्हापूरला बोटीतूनच पुरवण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले.

राष्ट्रीय महामार्ग ठप्प होऊन सहावा दिवस उजाडला. रस्त्यारून वाहणारे पाणी संथ गतीने कमी होत आहे. काल रात्री (ता. १० ) पासून काल सकाळ दहा पर्यत पाण्याची पातळी अर्धा ते पाऊण फूटाने कमी झाली असून, तरी आद्याप तीन ते साडे तीन फूट पाणी महामार्गावर आहे. पाण्याचा वेग प्रचंड आहे. 

महामार्गावरील पाण्यातून अवजड वाहतूक करता येणे शक्य आहे का याची चाचपणी पाण्याचा टँकर पोकलेन सह पाठवून घेतली. टॅकर पाण्याचा रस्ता पूर्ण करून गेला ; मात्र पाण्याला वेग वाहतूक सुरक्षीत नसल्याचे जाणवले. त्यामुळे महामार्गावरून अवजड वाहतूक ही होणार नाही. त्यामुळे कोल्हापूरात जिवनावश्यक वस्तुचा पुरवठा आपत्कालीनच्या बोट मधूनच केला जाणार आहे. 

राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी पूराचे पाणी असून, अनेक ठिकाणी महामार्ग बंद आहे. त्यामुळे बैंगलोर कडे जाण्यासाठी सोलापूर मार्गाचा वापर करावा असे आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. देशमुख यांनी केले.

सांगली फाटा येथे महामार्गावरील पाण्यातून अवजड वाहनांची घेतलेली चाचणी अयशस्वी झाली आहे. त्यामुळे आज महामार्गावरील वाहतूक बंदच राहणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune-Banglore highway remain closed due to flood situation