पुणे-कोल्हापूर वाहतूक अजूनही बंदच!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

पुण्यावरून वाहनचालकांना सातारा, कराड, उंब्रज, किणी टोलनाक्यापर्यंत जाता येईल, अशी माहिती महामार्ग पोलिस विभागाचे अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

पुणे : पुणे-कोल्हापूर रस्त्यावरील वाहतुकीची परिस्थिती गेल्या तीन दिवसापासून 'जैसे थे'च आहे. पुण्यावरून कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाड्या कराडच्या पुढे किणी टोलनाक्यापर्यंतच जात आहेत.

महामार्गावर साचलेल्या पाण्यामुळे कोल्हापूर शहरातून अजून एकही गाडी पुण्यात येऊ शकलेली नाही. बेंगलोरवरून येणाऱ्या गाड्या बेळगावच्या पुढे कोल्हापूरच्या जवळपास थांबविण्यात येत आहेत.

पुण्यावरून वाहनचालकांना सातारा, कराड, उंब्रज, किणी टोलनाक्यापर्यंत जाता येईल, अशी माहिती महामार्ग पोलिस विभागाचे अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune to Kolhapur traffic still stopped