Central Railway : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! पुणे-मिरज-पुणे एक्स्प्रेस 'या' दिवशी होणार सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Central Railway

ही गाडी पुण्याहून सकाळी आठ वाजता सुटणार असून ती मिरजेत दुपारी पावणेदोन वाजता पोहोचणार आहे.

Central Railway : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! पुणे-मिरज-पुणे एक्स्प्रेस 'या' दिवशी होणार सुरू

सांगली : जून महिन्यात पुणे-मिरज-पुणे एक्स्प्रेस (Pune Miraj Express) सुरू होणार असून ही गाडी दर मंगळवारी मिरज-पुणे मार्गावर धावणार आहे. ६ पासून ही गाडी सुरू होत आहे. सांगली-पुणे (Sangli) प्रवास करणाऱ्याची सोय होणार आहे.

ही गाडी पुण्याहून सकाळी आठ वाजता सुटणार असून ती मिरजेत दुपारी पावणेदोन वाजता पोहोचणार आहे. मिरजेतून दुपारी २.२५ ला गाडी सुटणार असून ती पुण्याला पावणेआठ वाजता पोहोचणार आहे.

पुणे-मिरज गाडी सुरु करण्याची प्रवाशांची मागणी होती. त्याची दखल घेत मध्य रेल्वेने (Central Railway) ही गाडी सुरू कऱण्याचा निर्णय घेतला. दर मंगळवारी ही गाडी धावणार आहे. जेजुरी, लोणंद, सातारा, कऱ्हाड, सांगली असे थांबे आहेत.

गाडीची वेळ ः पुणे-मिरज (०१४२३) ः सकाळी ८ वाजता पुण्याहून सुटेल. ८.५३/८.५५ जेजुरी, ९.३३/९.३५ लोणंद, १०.३२/१०.३५ सातारा, ११.२७/११.३० कराड, १२.२७/१२.३० सांगली, दुपारी १.४५ वाजता मिरज येथे पोहोचेल.

मिरज-पुणे (०१४२४) ः दुपारी २.२५ वाजता मिरजेहून सुटेल. २.३७/२.४० सांगली, ३.२८/३.३० कऱ्हाड, ४.२७/४.३० सातारा, ५.२८/५.३० लोणंद, ६.०५/६.०७ जेजुरी, सायंकाळी ७.४० वाजता पुणे येथे पोहोचेल.

टॅग्स :punemirajcentral railway