पुण्या-मुंबईतल्या पावसाचा मोहोळच्या शेतकऱ्यांना फटका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

मोहोळ : मुंबई व पुणे येथे सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे ग्रामीण भागातील भाजीपाला, कलिंगड, खरबूज उत्पादकांना दर कमी झाल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. 

गेल्या आठवड्यापासून मुंबई, पुणे आदी ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. ग्रामीण भागातील टोमॅटो, ढोबळी मिरची, वांगी या भाज्यांची मुंबई-पुणे बाजारपेठेतच मोठ्या प्रमाणात विक्री होते. अनेक शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार सिंचनाच्या माध्यमातून टोमॅटो, मिरची, वांगे सारखी कमी पाण्यात कमी वेळेत येणारी पिके घेतली आहेत. 

मुंबई बाजारपेठेत पावसामुळे भाजीपाला नेता येत नाही. त्यामुळे दर कोसळले आहेत. गेल्या आठवड्यात कलिंगड पंधरा ते वीस रुपये प्रति किलो असा दर होता. मात्र तेच कलिंगड दर कमी झाल्याने व खरेदीदार नसल्याने आठ ते नऊ रुपये प्रति किलो झाले आहे. नाशवंत भाजीपाला आहे, तो शेतातून काढून विक्रीसाठी पाठवावा लागतो. परिणामी इतर बाजारपेठेत आवक वाढल्याने दर कमी झाले आहेत. 

उन्हाळ्यात शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर टोमॅटो, वांगी यासारखी पिके घेतली. पुणे-मुंबई येथे पाऊस असल्याने त्याची विक्री होत नाही. एकदा कमी झालेले दर वाढायला फार वेळ लागतो. - समाधान भोसले, शेतकरी, पापरी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune-Mumbai rain affected on Mohol farmers