मल्लखांबपटूसही शासकीय नोकरीत मिळणार आरक्षण

mallakhamb
mallakhamb

बारामती - शासकीय नोकरीमध्ये पाच टक्के खेळाडूंना नोकरीसाठी आरक्षण देण्याच्या खेळाच्या यादीत आता मल्लखांब या देशी खेळाचा पुन्हा एकदा समावेश करण्यात आला आहे. 

खासदार सुप्रिया सुळे यांनी या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व क्रीडामंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन या बाबत पाठपुरावा केला होता. या दोघांनीही सुळे यांची ही मागणी मान्य करत तातडीने प्रशासनाला सूचना देत या संदर्भातील परिपत्रक जारी केले.

सुप्रिया सुळे सध्या राज्यात जागर युवा संवाद यात्रेच्या निमित्ताने फिरत आहेत. सोलापूर येथे युवकांशी संवाद साधत असताना प्रतिक्षा निमगिरे या मल्लखांब खेळाडूने शासकीय नोकरीत ज्या खेळाडूंना पाच टक्के जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत, त्यातून मल्लखांबाला वगळण्यात आल्याचे सुळे यांच्या निदर्शनास आणून दिले. वास्तविक मल्लखांब हा देशी खेळ असून त्याचा समावेश नोकरीसाठीच्या आरक्षणात असायला हवा, या मुळे मल्लखांब खेळाडूंवर विनाकारण अन्याय होत असल्याची भूमिका तिने मांडली. 
या नंतर सुप्रिया सुळे यांनी विनोद तावडे यांची प्रतिक्षा निमगिरे हिला सोबत घेत भेट घेतली व त्यांना पत्र दिले. तावडे यांनीही याची तातडीने दखल घेत या संदर्भात शासकीय अध्यादेश काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या नुसार 15 नोव्हेंबर रोजी असा अध्यादेश निघाला असून आता मल्लखांब खेळणा-या खेळाडूंनाही शासकीय नोकरीत पाच टक्के आरक्षणाचा फायदा होणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी तत्परतेने याची दखल घेत अध्यादेश जारी केल्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com