घाण करणाऱ्यांनो खबरदार; लाठी हाणेल हवालदार 

विजयकुमार सोनवणे
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

सोलापूर : स्मार्ट सिटीचे आकर्षण बनलेल्या होम मैदानावर कोण प्रातर्विधी किंवा घाण करणार असेल तर त्यांना आता सावध व्हावे लागेल. जे कोण घाण करेल त्यास लाठीचा प्रसाद देण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यासाठी होम मैदानावर पोलिसांचा स्वतंत्र तंबू असणार आहे.

महापालिकेचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी पोलिस उपायुक्त मधुकर गायकवाड, सहायक आयुक्त महावीर सकळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरसिंग अंकुशकर यांच्यासह होम मैदानाची पाहणी केली. यावेळी नगर अभियंता संदीप कारंजे, सहायक नगर रचना संचालक लक्ष्मण चलवादी, अभियंता विजय राठोड, तपन डंके यांच्यासह स्मार्ट सिटी कंपनीतील अधिकारी उपस्थित होते. 

स्मार्ट सिटी योजनेतंर्गत होम मैदानावर विकासकामे केली जात आहेत. मैदानाचे रूपडे पालटले आहे. मात्र, या परिसरात असलेल्या झोपडपट्टीतील काहीजण जाणीवपूर्वक नुकसान करत आहेत. या परिसरात बांधलेली भींतही पाडण्यात आली. अनेक लोक प्रातर्विधीसाठी मैदानाचा वापर करत आहेत. त्यामुळे डॉ. ढाकणे यांनी पोलिस अधिकाऱ्यांसह या संपूर्ण परिसराची पाहणी केली. मैदान स्वच्छ करण्यासाठी महापालिका प्रशासन झटत असताना काही लोक मात्र मनमानी कारभार करत आहे. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक भूमिका घेण्याचा निर्णय पाहणी दरम्यान घेण्यात आला. त्यानुसार, होम मैदानावर प्रातर्विधी किंवा घाण करणारा व्यक्ती आढळला की त्याला पोलिसांच्या लाठीचा प्रसाद मिळणार आहे. 

संचालक मंडळाची 20 डिसेंबरला सभा 
स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळाची त्रैमासिक सभा 20 डिसेंबरला सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामधाम येथे होणार आहे. या सभेत होम मैदान, रंगभवन चौक आणि हुतात्मा बागेचे उद्‌घाटन, उद्यान विभागातील कामे, एबीडी एरियात करावयाच्या कामांसाठीची निविदा प्रक्रिया या संदर्भात चर्चा होणार आहे. त्याचवेळी इतर विषयांबाबतही चर्चा होईल. 

Web Title: Punishment from police for uncleanliness in solapur