no-spitting
no-spitting

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे दंडास पात्र 

कऱ्हाड - रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर पालिका दंडात्मक कारवाईचा बडगा उगारणार आहे. सोमवारपासून ती मोहिम अत्यंत गतीने राबविण्यात येणार आहे. त्याची सुरूवात आजपासून झाली.

पालिकेने तिघांना सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल दंड केला आहे. लोकांना माहिती व्हावे, यासाठी उद्या अनेक ठिकाणी फलक लावण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरात सार्वजनिक ठिकाणी थुंकणे आता दंडास पात्र ठरणार आहे.

पालिकेने स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत स्वच्छतेची मोहिम हाती घेतली आहे. आरोग्य विभाग त्यासाठी सज्ज आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यावर कारवाईची मागणी लोकांतून होत होती. त्यामुळे पालिकेने सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यावर कारवाईची माहिम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पालिकेच्या आरोग्य विभागाने यशवंतराव चव्हाण स्मृती सदन परिसरात सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या तिघांवर दंडात्मक कारवाई केली आहे. ती मोहिम सोमवारपासून गतीने राबविण्यात येणार आहे. त्यासाठी बस स्थानकासह अनेक सार्वजनिक दंडात्मक कारवाई करणार असल्याचे फलक आरोग्य विभाग लावणार आहे. त्यामुळे लोकांना दोन दिवस आधी दंडात्मक कारवाई होणार असल्याचे कळावे, यासाठी ते फलक लावण्यात येणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com