कोल्हापूर : मोबाईलवर चॅटींग करण्याच्या कारणावरून चाैघांची तरूणाला मारहाण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - मोबाईलवर चॅटींग करण्याच्या कारणावरून चौघांनी तरूणास काठीने मारहाण केली. पुईखडी येथे झालेल्या या मारहाणीत तरूण जखमी झाला आहे. योगेश सिद्धार्थ कांबळे (वय 25, रा. माळ्याची शिरोली, ता. करवीर) असे जखमींचे नाव आहे. याबाबत करवीर पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल झाला. 

गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नांवे अशी - श्रीधर कांबळे (रा हळदी), धीरज कांबळे, अरविंद कांबळे, राकेश कांबळे (तिघे रा. सडोली खालसा, करवीर) अशी आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, योगेश कांबळे हे एका खासगी कंपनीत नोकरी करतो. मोबाईल ऍपद्वारे ऑनलाईन कर्ज मंजुरीचे काम सध्या कंपनीने त्याच्याकडे जबाबदारी दिली आहे. याच माध्यमातून त्याची संशयित श्रीधर कांबळेशी ओळख झाली. त्यांने त्याच्या ओळखीच्या एकाबरोबर मोबाईलवर चॅटींग केल्याचा रागातून गुरुवारी (ता.15) संशयित श्रीधर, धिरज, अरविंद आणि राकेश या चौघांनी पुईखडी येथे बोलवून घेतले. त्यानंतर त्याला मोटारसायकलवरून माळावर नेऊन तेथे काठीने व लाथाबुक्‍यांनी त्याला मारहाण केली अशी फिर्याद योगेश कांबळे यांनी दिली. त्यानुसार करवीर पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: quarrel on Mobile Chatting youth injured