कोल्हापूर : वर्गणी न दिल्याच्या रागातून तरूणाच्या डोक्‍यात घातली फरशी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

  • गणेशोत्सवाची वर्गणी न दिल्याच्या रागातून तरूणाला मारहाण. 
  • अर्जुन मनोहर शिंदे (वय 24) असे जखमी तरूणाचे नाव. 
  • राजारामपुरी चाैदाव्या गल्लीतील यशवंतनगरातील प्रकार
  • गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नांवे अशी - राज संजय जगताप (वय 19), युवराज आनंद जगताप (वय 22), रोहित रवी साळोखे (वय 19, सर्व रा. यशवंतनगर).

कोल्हापूर - गणेशोत्सवाची वर्गणी न दिल्याच्या रागातून तरूणाच्या डोक्‍यात फरशी मारून त्याला जखमी केले. अर्जुन मनोहर शिंदे (वय 24) असे जखमीचे नाव आहे. हा प्रकार बुधवारी रात्री राजारामपुरी चाैदाव्या गल्लीतील यशवंतनगरात घडला. याची नोंद राजारामपुरी पोलिसात झाली आहे. 

गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नांवे - राज संजय जगताप (वय 19), युवराज आनंद जगताप (वय 22), रोहित रवी साळोखे (वय 19, सर्व रा. यशवंतनगर) अशी आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अर्जुन हा यशवंतनगरात राहतो. बुधवारी रात्री त्यांच्या दारात संशयित राज जगताप, युवराज जगताप आणि रोहित साळोखे हे तिघेजण आले. त्या तिघांनी अर्जुनकडे गणेशोत्सवाची वर्गणी मागितली. त्यांने आता पैसे नाहीत, ही वर्गणी दोन सप्टेंबरला मंडळाचे अध्यक्ष युवराज शिंदे यांना देतो असे त्याने सांगितले. मात्र त्या तिघांनी वर्गणी आताच्या आता दे अशी मागणी करत वाद घातला. याच वादातून अर्जुनच्या डोक्‍यात फरशीचा तुकडा घालून त्याला लाथाबुक्‍यांनी मारहाण केली. घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. परिसरातील नागरिकांनी हे भांडण सोडवले. यानंतर जखमी अर्जुन शिंदेने दिलेल्या फिर्यादेनुसार संशयित राज, युवराज जगताप आणि रोहित साळोखे या तिघांवर राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: quarrel in Rajarampuri Yashwant Nagar youth injured