सांगलीत भररस्त्यात गुडांचा जीवघेणा हल्ला 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

सांगली - सांगली - माधवनगर रस्त्यावरील बायपास चौकात दुपारी तीनच्या सुमारास शेकडो लोकांसमोर एका टोळीने दुसऱ्या टोळीतील गुंडांवर जीवघेणा हल्ला केला. मावा देण्याघेण्याच्या किरकोळ कारणातून हा वाद झाला. कोयता आणि तलवार नाचवत गुंडांनी या परिसरात हौदोस घातला. 

प्राथमिक माहितीनुसार, तुका मोटे आणि रोहित आवळे असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले आहेत. पोलिस कर्मचारी बी. डी. चव्हाण यांनी हल्लेखोरांना रोखले. जखमींना तातडीने वसंतदादा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. त्यातील एकाची प्रवृत्ती नाजूक असल्याचे सांगण्यात आले. 

सांगली जिल्ह्यात खूनाचे सत्र सुरु आहे. गुंडांच्या टोळ्यांनी हैदोस घातला आहे. एकामागे एक खून पडत आहेत. त्यात आज आणखी एका हल्ल्याची भर पडली. दिवसभर प्रचंड गर्दी असलेल्या बायपास रस्त्याच्या चौकात दुपारी हा प्रकार घडला. शेकडो लोक वाहने थांबवून हा प्रकार बघत होते. कुणीही त्यात मधे पडले नाही. पोलिस कर्मचारी चव्हाण घरी जेवायला निघाले होते. त्यांनी हल्लेखोरांना रोखले. ते पळून गेले, मात्र या परिसरात सध्या दहशतीचे वातावरण आहे. 

Web Title: Quarrel in Sangli