किरकोळ वादातून दोन गटात राडा

अतुल मंडपे
शनिवार, 28 जुलै 2018

महाविद्यालयातील किरकोळ वादातून युवकांच्या 2 गटात आज राडा झाला. यामध्ये, रोहित रावसाहेब कांबळे यांच्यावर पोटात आणि छातीवर 8 गंभीर वार करण्यात आले. त्याच्यावर सांगलीच्या भारती हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहेत. जखमी रोहित याच्या समर्थकानी केलेल्या हल्यात सचिन राजाजम वगरे यांच्या पाणपट्टीसह घराचे मोठे नुकसान झाले आहे.

हातकणंगले - महाविद्यालयातील किरकोळ वादातून युवकांच्या 2 गटात आज राडा झाला. यामध्ये, रोहित रावसाहेब कांबळे यांच्यावर पोटात आणि छातीवर 8 गंभीर वार करण्यात आले. त्याच्यावर सांगलीच्या भारती हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहेत. जखमी रोहित याच्या समर्थकानी केलेल्या हल्यात सचिन राजाजम वगरे यांच्या पाणपट्टीसह घराचे मोठे नुकसान झाले आहे.

हातात लोखंडी गज आणि काट्यासह 70 ते 80 जणांच्या जमावाने हा हल्ला  केला. यात हिवरखण उर्फ पिंटू यवनापा ठोंबरे यांच्या डोक्यात गजाने घाव झाले आहेत. त्याच्यावर सी पी आर रुग्णालय कोल्हापूर येथे उपचार सुरु आहेत.

याशिवाय सचिन वागणे यांची आई लक्ष्मी आणि बहीण ज्योती आनंदा अथनीकर, सतीश धनगर, दत्तात्रय हजारे, रामचंद्र हजारे हे जखमी झाले आहेत. घटनेनंतर पाच तिकटी परिसरात शुकशुकाट होता. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, चारच्या सुमारास इचलकरंजीकडे जात असलेल्या एस.टी वर जमावाने दगडफेक केला. यात एस टी मधील महिला प्रवासी जखमी झाली आहे. महाविद्यालयात एकमेकांकडे बघत असल्याच्या कारणावरून हा प्रकार झाल्याचे समजते.

Web Title: Quarrel in two groups of minor issues