उंच झोका बांधू तरी कशाला ! माहेरवासिनींना पडला प्रश्न

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

भुईंज : वृक्ष, झाड-झुडपांचा मनुष्य जीवनात फार महत्त्व आहे. "वृक्ष वल्ली आम्हा सोयरे' म्हणजे झाड आपला मित्र म्हणजे मित्राविना जीवन नाही. म्हणजेच वृक्ष नाही तर जीवनही नाही. सर्व सजीवांना जिवंत राहण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या झाडाचे प्रमाण ग्रामीण भागात कमी झाले आहे. आज नागपंचमीच्या सणाला उंच झोका बांधायचा कशाला, असा माहेरवासिनींचा प्रश्न पडला आहे. 

आज वाई तालुक्‍यासारख्या ग्रामीण भागातही गावच्या ठिकाणी असणारे वृक्ष काळाच्या ओघात सिमेंटच्या जंगलात हरवून गेले आहेत. शहरात गॅलरीत झोके बांधायची पद्धत सुरू झाली असताना आता ग्रामीण भागात येणाऱ्या काही दिवसातही पद्धत सुरू होती, की काय असे चित्र आहे. पूर्वी गावची ओळख ही मोठमोठ्या झाडांवरून होत होती. गावात शिरताच अगदी गावाच्या वेशीजवळ भली मोठमोठी वड, चिंच, पिंपळ, लिंब व गावाच्या शेजारी मोठमोठी आब्यांची झाडे असायची. नागपंचमीला सणापूर्वींच अगोदर आठ दिवस या झाडांना छोटे व मोठे- मोठे झोके लोंबकळत असलेले दिसायचे. या सणाला इतके महत्त्व होते, की गावागावांतील लग्न होऊन सासरी नांदायला गेलेल्या मुली या सणाला आवर्जून माहेरी येत होत्या. मग काय सणाच्या आदल्या दिवशी सासरहून आलेल्या मुली एकत्र जमून गप्पागोष्टी करत करत नाग देवताची म्हणजेच वारुळाची पूजा करायच्या आणि एकदा जेवण झाले, की सर्व महिला एकत्र येऊन झोक्‍याचा आनंद घेण्यासाठी झोक्‍याकडे यायच्या. आज ही ओळख वृक्षतोडीमुळे संपुष्टात आली आहे. 

झाडांची नावे फक्त गावांच्या नावापुरतीच 

वाई तालुक्‍यात अनेक गावांची नावे ही झाडांच्या नावावरून, तसेच संख्येवरून पडलेली आहेत. महामार्गावरील प्रत्येक गावचा थांबा हा झाडांच्या खुणेवरून समजत होता. त्याच ठिकाणी नागपंचमीला झोके बांधलेले दिसायचे. आज ते दृश्‍य लोप पावले आहे. आज झोक्‍याअभावी सणाची पद्धती काहीशी बदलत चालली आहे. झाडांची नावे फक्त गावांच्या नावापुरतीच शिल्लक राहिली आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The question arise on Nagpanchimi's occasion