चोर समजुन मारण्याच्या घटनांबाबत पोलीसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

police.
police.

मोहोळ - चोर समजुन एखादया गावातील जमावाकडुन कामासाठी गेलेल्या नागरिकांना जिवे मारण्याच्या व गंभीर जखमी करण्याच्या प्रकारात गेल्या महिनाभरापासुन मोठी वाढ झाली आहे. साक्री तालुक्यातील राईन पाडा गावात चोर समजुन पाच जणांची हत्या झाली. तर पंढरपूरचे नगरसेवक ही गंभीर जखमी झाले. एवढे सर्व होत असताना ज्याच्यावर नागरीकांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे असे पोलीस खाते ही  अद्याप गप्पच आहे. घटना घडल्यावर कागदी घोडे नाचवुन कायदेशीर सोपस्कार करणे हे त्यांच कर्तव्य असले. तरी अशा घटना होऊच नयेत यासाठी शेवटच्या कर्मचाऱ्यापासुन ते वरिष्ठापर्यंत कुठलीही उपाययोजना केल्याचे जाणवत नाही. एवढेच नव्हे तर गावोगावी असणारे ग्रामसुरक्षा दल कुठे आहे, की कागदावरच आहे, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. पोलीसांकडुन अफवावर विश्वास ठेऊ नका एवढेच पालु पद ऐकवीले जात आहे. यावर तातडीने उपाय योजना करणे गरजेचे आहे. अन्यथा अशा किती घटना घडणार हे प्रश्नचिन्हच आहे.

गेल्या महिन्याभरापासुन अशा घटनात वाढ झाली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विषेश पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील हे सोलापुर जिल्हयाच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी ज्या ज्या पोलीस ठाण्याला भेटी दिल्या त्या त्या ठिकाणी ग्रामसुरक्षा दलाच्या विषयाला प्राधान्य दिले. वरिष्ठांनी लगेच नवीन रजिष्टर आणुन त्यावर गावोगावच्या कधी काळी स्थापन केलेल्या कार्यकर्त्याची नावे लिहुन ती वरिष्ठांना पाठवुन देऊन मोकळे झाले. मात्र पुढे काय गावोगावी ग्रामसुरक्षा दल कार्यरत असल्यास अशा घटनांना मोठा आळा बसेल. निष्पाप जीव वाचतील. तसेच अनोळखी व्यक्ती गावात आल्यास त्यांच्या कडील ओळखपत्र आधारकार्ड पाहुन संबंधीत पोलीस ठाण्याला फोन केला तरी खात्री होऊ शकते. 

पोलीस खात्याचे जरी कर्तव्य असले तरी नागरीकांनीही कांही गोष्टीची खबरदारी घेतली तरीही अशा घटना टळतील. स्वतःच्या वाहनातुन जाताना गाडीला एखादा फलक लावणे. स्वतःची ओळख पटेल अशी कागदपत्र जवळ बाळगणे. अशा उपाययोजना केल्या तरीही या गोष्टी टळतील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत कामाच्या सोयीसाठी बिट पद्घत आहे. संबंधीत पोलिस कर्मच्याऱ्याने नागरीकांना सोबत घेऊन गस्त घालणे गरजेचे आहे अशा घटना घडल्यावर कोणत्याही वरिष्ठ वा कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने बैठक घेऊन उपाय योजना करणेचे गरजेचे आहे. मात्र असे होताना दिसत नाही. विश्वास नांगरे पाटलांनी तर पुरुष ग्रामसुरक्षा दलाबरोबर महिला ग्राम सुरक्षा दल स्थापनेची घोषणा केली आहे. मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. अशा घटना वाढल्यामुळे पोलिसा बद्दल सर्वसामान्याच्या मनात रोष वाढत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com