कोल्हापुरात रांगा कायम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - जुन्या नोटा बदलण्यासाठी बॅंकांसह सकाळी सुरू झालेल्या एटीएम मशीनवर लोकांच्या रांगा आजही कायम राहिल्या. रक्कम देण्याची मर्यादा वाढवली; पण त्या तुलनेत चलन पुरवठा न झाल्याने तासाभरातच एटीएममधील पैसे संपले. त्यामुळे लोकांना मनःस्ताप सहन करावा लागला. बॅंकेच्या रांगेतही प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.

केंद्र सरकारने 8 नोव्हेंबरपासून 500 व 1000 च्या चलनी नोटा रद्द केल्या. 11 नोव्हेंबरपासून बॅंकांत प्रत्येकी चार हजार रुपये बदलून देण्यास सुरवात झाली. लोकांच्या सोयीसाठी शनिवार, रविवार या सुटीदिवशीही बॅंकांचे कामकाज सुरू राहिले. पण काल गुरुनानक जयंतीची सुटी असल्याने बॅंका बंद राहिल्या.

आज बॅंकांचे कामकाज सुरू झाले; पण दारात पहाटेपासूनच नोटा बदलण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या होत्या. पोस्ट कार्यालयातही हेच चित्र पाहायला मिळाले. रविवारपर्यंत एका व्यक्तीला चार हजार रुपयेच दिले जात होते. आज ही मर्यादा वाढवली; पण 500 ची नवी नोट बाजारात आलेली नाही. येणारे चलनही अपुरे, त्यामुळे प्रत्येकी चार हजार रुपये तेही तास - दोन तास रांगेत थांबल्यावरच मिळू लागले. त्यातून लोकांचा संताप अनावर झाला. यामुळे अनेक बॅंकांत वादावादीचे प्रसंग घडले.

काही बॅंकांची एटीएम मशिन्स आजपासून सुरू झाली. पण त्यातही अपुरे पैसे भरले होते. एटीएममधून पैसे काढणाऱ्यांची संख्या जास्त आणि पैसे कमी असल्याने दुपारनंतरच ही एटीएम मशीन बंद झाली. परिणामी या मशीनबाहेर दोन तासाहून अधिक काळ थांबलेल्या लोकांना पैशाशिवाय माघारी फिरावे लागले.

Web Title: queue in bank