esakal | आयर्विन बंदमुळे वाहनांच्या रांगा ; "बायपास'वर ताण 

बोलून बातमी शोधा

Queues of vehicles due to Irwin closure; Stress on "bypass"}

सांगलीचे वैभव असणारा नव्वदीपार आयर्विन पूल दुरुस्तीसाठी सध्या बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे बायपास रस्त्यावर वाहतुकीचा ताण वाढला आहे.

आयर्विन बंदमुळे वाहनांच्या रांगा ; "बायपास'वर ताण 
sakal_logo
By
घनशाम नवाथे

सांगली : सांगलीचे वैभव असणारा नव्वदीपार आयर्विन पूल दुरुस्तीसाठी सध्या बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे बायपास रस्त्यावर वाहतुकीचा ताण वाढला आहे. वाहनांची कोंडी निर्माण होत आहे. वाहनांच्या रांगा लागल्याने ट्रॅफिक जामचा अनुभव येत आहे. सांगलीवाडीसह इस्लामपूर, आष्टा भागातून येणाऱ्या वाहनधारकांना "नो एन्ट्री' चा फलक पाहून बायपासमार्गे मार्गक्रमण करावे लागत आहे. आयर्विन पुलाची डागडुजी सुरु असल्याने महिनाभर वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. मात्र मोठा फटका प्रवाशांना बसत आहे. 

बायपास पुलावरुन वाहतूक वाहतुकीचा पर्याय म्हणजे सांगलीवाडीहून येणाऱ्यासाठी वाईवरून सातारा अशी स्थिती झाली. तीन दिवस प्रवाशी अनुभव घेत आहेत. तीन किलोमीटर अंतर पार करुन सांगलीवाडी वासियांना सांगलीत येण्याची कसरत करावी लागत आहे. सध्या आयर्विनवरुन पादचाऱ्यांनाच जाता येते. दुचाकी, चारचाकी वाहनांना नो एन्ट्री असल्याने वाहतूक बायपास रस्त्यावर आली. 

सांगलीवाडीतून उलटे जाऊन टोलनाक्‍यामार्गे मोठ्या वाहनधारकांना जावे लागते. तीच गत सायकल व दुचाकीधारकांची झाली आहे. विद्यार्थी, नोकरदारांसह अन्य कामांसाठी सांगलीत येणाऱ्यांची गोची होत आहे. अवघे 200 मीटर पूल पार करुन कित्येक वर्षे ये-जा करणाऱ्यांचे हाल होत आहे. बायपास रस्त्यावर येणारी वाहतूक तिपटीने वाढलीय. वाहनांच्या रांगा लागत असल्याने शिवशंभो चौक, पटेल चौकात प्रचंड गर्दी होत असल्याचे चित्र आहे. 

पलूस, कडेगाव, सातारा जिल्ह्यातून येणाऱ्यांमुळे अगोदरच शिवशंभो चौकात गर्दी होते. आता बायपासवरुन येणाऱ्यांची भर पडल्याने ट्रॅफिक जाम ही नित्याचीच समस्या बनत आहे. अपघात वाढण्याचीही शक्‍यता सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्‍त केली. आयर्विन वाहतुकीसाठी लवकरात पूर्ववत सुरू करण्याची मागणी वाढत आहे. 

संपादन : प्रफुल्ल सुतार