सांगलीत कुंटणखान्यावर छापा, दोन युवतींची सुटका

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

सांगली : शहरातील गोकुळनगरमध्ये सुरु असलेल्या एका कुंटणखान्यावर
विश्रामबाग पोलिसांनी छापा टाकून बांगलादेश आणि पश्‍चिम बंगालमधील दोन युवतींची सुटका करण्यात आली. कुंटणखाना चालवणाऱ्या ज्योती संतोष कट्‌टीमणी (वय 27, रा. गोकुळनगर, टिंबर एरिया, सांगली) या महिलेस अटक केली आहे. याबाबत अब्राहम शशिकांत हेगडे यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गोकुळनगरमधील चौथ्या गल्लीत ज्योती कट्‌टीमणी ही महिला कुंटणखाना चालवत असल्याची माहिती विश्रामबाग पोलिसांना मिळाली. ही महिला बांगलादेशी आणि पश्‍चिम बंगालमधील युवतींकडून हा कुंटणखाना चालवत होती.

याबाबत पुण्यातील ऍडमिन फ्रीडम फर्म या सामाजिक संघटनेचे अब्राहम हेगडे यांनी विश्रामबाग पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. काल रात्री (शुक्रवारी) नऊ वाजण्याच्या सुमारास विश्रामबाग पोलिसांनी या कुंटणखान्यावर छापा टाकला. त्यावेळी तेथे बांगलादेशातील ढाका येथील एक 25 वर्षीय युवती आणि दुसरी पश्‍चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणा येथील 25 वर्षीय युवती वेश्‍याव्यवसायासाठी असलेल्या आढळून आल्या. त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांची सुटका केली. तर कुंटणखाना चालवणाऱ्या ज्योती कट्‌टीमणी या महिलेस अटक केली.

Web Title: rade on brothel in sangali two girls release