दोनशे जागा जिंकण्याचे युतीचे उद्दीष्ट : विखे पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जुलै 2019

मला श्रेय मिळू नये म्हणून निधी नव्हता
निळवंडे कालव्यांच्या कामासाठी भरीव तरतूद करून युती सरकारने हा प्रश्न मार्गी लावला आहे. यापूर्वी काँग्रेस-आघाडी सरकारच्या काळात मला श्रेय मिळू द्यायचे नाही, याच उद्धेशाने निधी दिला जात नव्हता, अशी कबुली विखे पाटील यांनी दिली.

नगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली युती सरकारने चांगली कामे केली आहेत. दोनशे जागा जिंकण्याचे युतीचे उद्दीष्ट आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेसच्या हाती काहीही लागणार नसून, लोकसभेचीच पुनरावृत्ती विधानसभेलाही होईल, असा दावा गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे केला.

शिर्डी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमास ते उपस्थित होते. या वेळी ते म्हणाले, काँग्रेसने जुनेच चेहरे नव्याने पुढे केले आहेत. नगर जिल्ह्यात भाजप 12 विरुद्ध 0 अशीच स्थिती राहणार आहे.

काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षांना मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पडत असेल तर त्याआधी त्यांनी पक्षात किती आमदार राहतील, याची काळजी घ्यावी, असा सल्लाही विखे पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना दिला.

मला श्रेय मिळू नये म्हणून निधी नव्हता
निळवंडे कालव्यांच्या कामासाठी भरीव तरतूद करून युती सरकारने हा प्रश्न मार्गी लावला आहे. यापूर्वी काँग्रेस-आघाडी सरकारच्या काळात मला श्रेय मिळू द्यायचे नाही, याच उद्धेशाने निधी दिला जात नव्हता, अशी कबुली विखे पाटील यांनी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Radha Krishna Vikhe Patil claims BJP Shivsena alliance wins 200 seats