Loksabha 2019 : राष्ट्रवादीचे काम नगरमध्ये करणार नाही : विखे पाटील

Radha Krishna Vikhe Patil
Radha Krishna Vikhe Patil

नगर : आपण राष्ट्रवादीचे काम नगरमध्ये करणार नाही. राज्यात मात्र पक्ष जो भूमिका घेईल, ते होईल, असे सांगून नगरमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांचे काम करणार नसल्याचे काँग्रेसचे स्टार प्रचारक राधाकृष्ण विखे पाटील खासदार दिलीप गांधी यांच्या भेटीनंतर स्पष्ट केले.

विखे पाटील यांनी खासदार गांधी यांच्यासोबत साडेबारा वाजेपर्य़ंत चर्चा केली. चर्चेनंतर विखे बाहेर आले, त्या वेळी दोन्ही नेते खूष दिसत होते. या वेळी गांधी यांनी विखे यांचा सत्कार केला. गांधी यांचे निवडक कार्यकर्तेही उपस्थित होते. त्यानंतर विखे यांनी माध्यमांशी बोलण्याचे टाळले. तसेच गांधी यांच्याशी माझे मित्रत्त्वाचे नाते असून, राजकीय चर्चा झाली नाही. सहजच आलो होतो, असे सांगून त्यांनी भाष्य करण्याचे टाळले.

बुधवारी रात्री साडेदहा वाजता अचानक काॅंग्रेसचे स्टार प्रचारक व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपचे नाराज असलेले खासदार दिलीप गांधी यांच्या बंगल्यावर आले. तब्बल दोन तास बंद खोलीत चर्चा झाल्यानंतर दोघांचेही चेहरे खुललेले होते. काय झाली चर्चा, रात्री बाराची चर्चा कोणास फलदायी ठरणार, याबाबत स्पष्ट बोलण्यास दोघांनीही टाळले असले, तरी विखेपूत्र डाॅ. सुजय विखे यांच्यासाठी गांधीपूत्र सुवेंद्र गांधी उमेदवारी मागे घेतील, असाच सूर या चर्चेतून निघाल्याचे मानले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com