अहमदनगरमध्ये विखे पाटलांना धक्का

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

नगर- जिल्ह्यातील सात नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतील निकाल म्हणजे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना चांगलाच धक्का मानला जातो. त्यांच्या मतदारसंघातील राहात्यासह त्यांनी लक्ष घातलेल्या दोन ठिकाणी भारतीय जनता पक्षाने मुसंडी मारली.

भाजपने राहाता, पाथर्डी, देवळाली प्रवरा येथील नगराध्यक्षपदासह पालिकाही जिंकल्या. तिन्ही ठिकाणी कॉंग्रेस पराभूत झाली. कोपरगावमध्येही विखे पाटील यांनी लक्ष घातले होते. तेथे नगराध्यक्षपदी भाजपचा बंडखोर जिंकला व पालिकेत युतीला बहुमत मिळाले. राहुरीत विखे पाटील व भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांची आघाडी पराभूत झाली. शिर्डी नगरपंचायतीतच विखे पाटील यांची सत्ता अबाधित राहिली.

श्रीरामपूर येथे विखे समर्थक व कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांची पत्नी राजश्री नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्या. सर्वपक्षीय महाआघाडीच्या अनुराधा आदिक (राष्ट्रवादी कॉंग्रेस) "जायंट किलर' ठरल्या. पालिकेत कॉंग्रेसला बहुमत मिळाले. आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथील विजयाची परंपरा कायम राखली. नगराध्यक्षपदी त्यांच्या भगिनी दुर्गा तांबे विजयी झाल्या.

Web Title: radha krishna vikhe patil loss nagar palika election